शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

फळपीक लागवडीत पालघर प्रथम; काजूच्या जवळपास दाेन लाख कलमांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 1:18 AM

जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेत २५ हजार ७५९ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत.

पालघर :  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ७२ लाभधारकांनी विविध फळपिकांची २५५८.०७ हेक्टरवर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. काजूच्या जवळपास दाेन लाख कलमांची लागवड करण्यात आली आहे. एक जिल्हा एक उत्पादन योजनेंतर्गत चिकू पिकाची राज्य स्तरावरून निवड करण्यात आली असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेत २५ हजार ७५९ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी २१ हजार १९५ घरे पूर्ण झालेली आहेत. याचबरोबर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि आदिम योजनेंतर्गत ६१०६ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली असून यापैकी चार हजार ०६ घरकुले पूर्ण झालेली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. 

जलजीवन मिशन योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये ६८,८४३ कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपात नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कातकरी उत्थान अभियानांतर्गत खाजगी जागेवरील ३१८८ घरांचे, वनविभागाच्या जागेवरील ८२० घरांचे, शासकीय जागेवरील ३९३ घरांचे आणि गावठाण जागेवरील २७५५ घरांचे अतिक्रमण नियमानाकुल करून आदिवासींच्या नावे करून दिली आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

४४ हजार ५२२ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूरजिल्हा वन हक्क समिती कक्ष स्थापन करून जिल्ह्यात वन हक्क कायद्यांतर्गत आजअखेर ४४ हजार ५२२ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करण्यात आले. त्याचे क्षेत्र ५०३८५ एकर इतके आहे. मागील चार महिन्यांत ४२२९ वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करून, आदिवासींना त्यांचा हक्क देण्यात आला आहे. तसेच ४३७ सामूहिक वन हक्क दावे मंजूर असून त्याचे क्षेत्र ५५ हजार ४१ एकर इतके आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांना शिवभोजन योजना सुरू करून वर्षभरात चार लाख ५३ हजार ११९ थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात मजुरांना गावातच रोजगार देण्यासाठी नऊ हजार ५५५ एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध केली आहेत.