शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:32 IST

रस्ता वाहतूक कोलमडली : अनेकांच्या घरांत शिरल्याने नुकसान

पालघर : संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशी अक्षरश: झोडपले. यामुळे गाव-शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हाभरात अनेक मार्गांवरील रस्त्यावर पाणी आल्याने, तसेच दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. तसेच जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक विद्युत जनित्रे बिघडल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. पालघर न्यायालयासह अनेक शासकीय कार्यालयात पाणी शिरले असून दोन दिवस घराबाहेर पडू नये असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यात सरासरी २६५.४४ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस डहाणू तालुक्यात ४६५.२८ मिमी, तर सर्वात कमी पाऊस मोखाडा तालुक्यात ८७.५५ मिमी इतका पडला. तलासरी तालुक्यात ४२३.८ मिमी, वसई १९६ मिमी, जव्हार १६२ मिमी, विक्र मगड १८७ मिमी, वाडा २२२ मिमी, तर पालघर ३७९.९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गाव, पाडे, शहरातील घरे, दुकानांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत.जिल्ह्यातील पालघर, सफाळे, केलवेरोड, बोईसर, वाणगाव, डहाणू आदी रेल्वेस्थानकांतील रेल्वे रु ळावर पाणी साचल्याने रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ न अत्यावश्यक सेवेतील लोकल सेवा विस्कळीत झाली. पालघर शहरातील विष्णू नगर, लोकमान्य पाडा, घोलविरा आदी भागांतील घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांच्या घरातील अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपाट आदी सामान भिजले. काहींनी कमरे इतक्या पाण्यात रात्र काढली. शहरात वाढलेली नियोजनशून्य बांधकामे, भराव आणि नगर परिषदेने या वर्षी पुरेशी गटारे साफ न केल्यामुळे गटारी तुंबल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. पालघर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाºया तसेच आयकर कार्यालयाच्या भागात अनेक भागात पाणी साचले होते.पालघर न्यायालयात गुडघाभर पाणी साचले. या दरम्यान पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेला साप न्यायालयात शिरत एका बाकड्यावर वेटोळे करून बसल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली. तसेच न्यायाधीशांच्या निवासस्थानातही पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले. याशिवाय नव्याने उभारण्यात येणाºया जिल्हा मुख्यालयासमोरील रस्त्यावर तीन फूट पाणी साचल्याने पालघर-बोईसर रस्त्यावरील वाहतूक पूर्णत: बंद पडली. या मार्गावर मनोर गावाच्या पुढे हात नदीला पूर आल्याने मुंबईकडून आलेली वाहने रात्रीपासून अडकून पडली आहेत.५ आणि ६ आॅगस्ट या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला आहे.तर १ आॅगस्टपासून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या उत्तन, वसई, डहाणू, सातपाटी, मुरबे येथील ३७ बोटी अजूनही समुद्रात नांगर टाकून मासेमारीला थांबल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली.जिल्हा आपत्कालीन यंत्रणा नावापुरती1कुलाबा वेधशाळेने १ आॅगस्टपासून ६ आॅगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर ही आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना आखल्या गेल्या नसल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसल्याचे पाहावयास मिळाले.2अनेक ठिकाणी झाडे पडली होती. रस्ते वाहून गेले. अनेक गावांचा संपर्क तुटाला होता. काही जण पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र, तोकड्या आपत्कालीन यंत्रणेची यामध्ये प्रचंड दमछाक होत होती. त्यामुळे आपत्कालीन यंत्रणा आहे कुठे, असा प्रश्न पडला होता.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर