शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुलाचा खून करून बापाने संपवलं जीवन; जव्हारमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 20:33 IST

Palghar Crime News: जव्हार तालुक्यातील पिंपळशेत येथील रहिवाशी शरद भोये याने आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या करून, स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे.

- हुसेन मेमनजव्हार तालुक्यातील पिंपळशेत येथील रहिवाशी शरद भोये याने आपल्या १५ वर्षांच्या मुलाची हत्या करून, स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. आदित्य उर्फ भावेश शरद भोये (वय १५) असे मृत मुलाचे व शरद रघुनाथ भोये (वय ४०) आत्महत्या करणाऱ्या वडिलांचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील पिंपळशेत परिसरात राहणारे शरद रघुनाथ भोये मुंबई येथे बेस्ट सेवेमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत होते. शरद भोये यांचे वडील रघुनाथ जानू भोये बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिंपळशेत होळीची माळी येथील त्यांच्या शेतावरील घरी गेले असता त्यांना एक धक्कादायक चित्र घरात दिसून आले. त्याचा पंधरा वर्षाचा नातू भावेश याचा मृतदेह घरात पडला होता आणि दुसऱ्या खोलीत त्याचा मुलगा शरद गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यानंतर याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोनही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरद भोये यांनी पिंपळशेत परिसरातील होळीची माळी येथे शेतावरील घरात स्वतःच्या मुलाचे जमिनीवर डोके आपटून दोरीने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर नायलॉन दोरीच्या सहाय्याने घरातील दुसऱ्या खोलीत लोखंडी अँगलला गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली. शरद भोये यांनी मुलगा भावेश याची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी भोये यांच्या कुटुंबीयांची देखील पोलिस चौकशी करण्यात येत असून अधिक तपास जव्हार पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpalgharपालघर