शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Palghar: भ्रष्टाचाराच्या पैशांवरून अधिकाऱ्यांमध्ये जुंपली, जव्हार कृषी विभागात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 08:03 IST

Corruption: जव्हार कृषी विभागात त्यात मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून, भ्रष्टाचाराचे पैसे कृषी अधिकाऱ्याला मिळाले नसल्याने तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

- हुसेन मेमनजव्हार - राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी कृषी विभागात वाटप करण्यात आला असून, पालघर जिल्ह्यात हा निधी फक्त कागदावरच असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, जव्हार कृषी विभागात त्यात मोठा भ्रष्टाचार उघड झाला असून, भ्रष्टाचाराचे पैसे कृषी अधिकाऱ्याला मिळाले नसल्याने तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादाचे व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागले आहेत.

जव्हार तालुक्यात कृषी विभागात एक तालुका कृषी अधिकारी, दुसरे कृषी अधिकारी तसेच मंडळ अधिकारी-१ व मंडळ अधिकारी-२ अशी पदे आहेत. त्यामध्ये कृषी अधिकाऱ्याला बायपास करून देयके अदा करण्यात आल्याने व त्याला वाटा मिळाला नसल्याने दोघा अधिकाऱ्यांमधील वाद उफाळला आहे. भ्रष्टाचाराचे पैसे दोघांमध्ये बरोबर वाटप झाले नसल्याने दोघांत कडाक्याचे भांडण होत असून, दोन्ही अधिकारी एकमेकांवर ताशेरे ओढत असल्याचा व्हिडीओ हाती आला आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महाराष्ट्रात राबविले जात असून कृषी आयुक्तांनी कृषी विभागास २०२२-२३ साठी ३७६२.५८० लाख निधी मंजूर केला आहे. २०२३-२४ साठी १६४७५.७७५ लाख निधी मंजूर करण्यात आलेला असून ३१ जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. 

वाटा मिळाला नसल्यामुळे बाचाबाची - जव्हारचे तालुका कृषी अधिकारी दीपक सोमवंशी यांनी स्वत: व मंडळ कृषी अधिकारी-१ जयराम आढळ व मंडळ कृषी अधिकारी-२ संजीव गोसावी यांनी ‘पेड बाय मी’ देयके सादर केल्यामुळे कार्यालयातील कृषी अधिकारी वसंत नागरे यांनी ‘पेड बाय मी’मध्ये त्यांचे नाव नसल्याने त्यांना वाटा मिळाला नाही. - त्यामुळे नागरे यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात तालुका कृषी अधिकाऱ्यांबरोबर बाचाबाची करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. मागील दोन महिन्यांपासून रोजच सोमवंशी व  नागरे यांचा तमाशा सुरू असल्याने कार्यालयात चर्चेला उधाण आले असून झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :palgharपालघरCorruptionभ्रष्टाचार