शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पालघरला विधानसभेची गणिते बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:38 AM

पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांनी बविआच्या बळीराम जाधव यांचा ८८ हजार ५९८ मतांनी पराभव केला आहे.

- हुसेन मेमनजव्हार : अगदी उमेदवार निवड ते चिन्ह वाटप आणि पक्ष बदल इथपर्यंत अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावीत यांनी बविआच्या बळीराम जाधव यांचा ८८ हजार ५९८ मतांनी पराभव केला आहे. यामुळे पालघरवर पुन्हा एकदा भगवा फडकला असून या लोकसभेच्या निवडणुकीने सहाही विधानसभा मतदारसंघाचे गणिते मात्र बदलली आहेत. बविआला त्यांच्याच बालेकिल्ल्यात सपाटून मार खावा लागला तर भाजपाचे आमदार असलेल्या डहाणू आणि विक्रमगड विधानसभेत मात्र आघाडीने मुसंडी मारली असून युतीला जोरदार झटका दिला आहे. मात्र या विधानसभानिहाय बदललेल्या गणितामुळे विधानसभेच्या चित्रात बदल पहावयास मिळेल हे नक्की. बविआची खरी मदार असलेल्या बोईसर नालासोपारा मतदरसंघात युतीने जोरदार मुसंडी मारली तर वसईमधूनही बविआला अपेक्षित आघाडी घेता आली नाही तर पालघरमते युतीने मोठे मताधिक्य मिळवले. महाआघाडीने युती पेक्षा ५ हजार ५५४ अधिक मते घेऊन आघाडी घेतली. कारण पोटनिवडणुकीत सीपीएम कॉंग्रेस बविआ आणि राष्ट्रवादी यांची मिळून मते ही सेना भाजप पेक्षा ६० ते ७० हजारांनी मागे होती. मात्र या निवडणुकीत जिथे युतीने चौफेर फटकेबाजी केली. मुळात विक्रमगड पूर्वीपारपासून भाजपाचा बालेकिल्ला असून सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास कॅबिनेट मंत्री विष्णू सवरा यांचा मतदारसंघ आहे. यामुळे या मतदरसंघातून गाविताना आघाडी मिळणे आवश्यकच होते. मात्र इथे आघाडीने युतीला मागे टाकल्याचे दिसले. विक्र मगडमध्ये आघाडीने आपली ताकद वाढवून दाखवली आहे.।महायुतीसाठी ही धोक्याची घंटा?विक्रमगड विधानसभा हा आघाडीत तसा राष्ट्रवादीच्या वाटेला आहे. यामुळे या ठिकाणी विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांचा होमटाउन असलेल्या या मतदारसंघात महाआघाडीच्या सर्वच नेते मंडळीने प्रचंड मेहनत घेतल्याचे यावेळी दिसून आले. त्यातूनच महाआघाडीच्या एवढ्या बिकट स्थितीतही आघाडीने इथे पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. एकूणच महाआघाडीची ही आघाडी युतीला विधानसभेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.