शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी हजेरीवर पालघरचा बहिष्कार!

By admin | Updated: January 11, 2017 06:06 IST

महाराष्ट्र शासनाच्या शालेय विद्यार्थ्यांची दैनिक हजेरी सेल्फीने नोंदविण्याच्या धोरणावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक संघ इ. संघटनांनी बहिष्कार टाकला

हितेन नाईक / पालघरमहाराष्ट्र शासनाच्या शालेय विद्यार्थ्यांची दैनिक हजेरी सेल्फीने नोंदविण्याच्या धोरणावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक संघ इ. संघटनांनी बहिष्कार टाकला असून तसे निवेदन त्यांनी जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. हा निर्णय आमच्यावर लादतांना शासनाने कुठलीही आॅन लाइन व्यवस्था अथवा निधी उपलब्ध करून दिला नाही. पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जात असून या भागातील अनेक गाव, पाडे आजही विद्युत सेवा आणि इंटरनेट या सुविधांपासून कोसो दूर आहेत. आधीच आॅनलाइनच्या कामात शिक्षकवर्गा शालार्थ, सरल, शिष्यवृत्या, आधार, विद्याथ्यांची माहिती, एमडीएम इ. सारख्या आॅनलाइन योजना राबवितांना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय सायबर कॅफेत जाऊन पदरमोड करावी लागते. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे पुरेसा वेळ देता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे.सेल्फी दैनिक हजेरीचे धोरण हे वेळखाऊ, शिक्षकांवर अविश्वास दाखिवणारे आणि शैक्षणिक दर्जावर परिणाम करणारे असल्याने शिक्षक सेना, प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी संघटना व इतर सर्व संघटनांनी पालघर जिल्हा परिषदे समोर निषेध नोंदवून बहिष्काराचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. सर्व शिक्षकांनी हे काम न करण्याबाबत एकमताने ठरविले असून कामावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती निवेदना द्वारे देण्यात आली.