शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये 68 हजार 260 रुग्णांनी केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 00:40 IST

वाढत्या रुग्णसंख्येत समाधानाची बाब : आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न

पालघर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, अनेक रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. याचवेळी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असून, योग्य ती काळजी घेतल्यास तसेच सकारात्मक विचारांनी कोरोनावर मात करता येते, हाच संदेश या आजारातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून मिळत आहे. दरम्यान, संपूर्ण पालघर जिल्ह्यात आजवर ६८ हजार २६० रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात यावेळी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. आरोग्य खात्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, रविवारी डहाणू तालुका ८४, जव्हार ३२, मोखाडा २३, पालघर ४९४, तलासरी ५ आणि विक्रमगड ५ असे ग्रामीण परिसरात नवीन रुग्ण आढळले. वसई ग्रामीण आणि वाडा तालुक्यांमध्ये मात्र रविवारी नवीन रुग्ण न आढळल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या पालघरच्या ग्रामीण भागात डहाणू तालुका १ हजार ९२, जव्हार ६१४, मोखाडा ३५१, पालघर ४ हजार २१९, तलासरी ४०९, वसई ग्रामीण १३४ विक्रमगड २२२ तर वाडा तालुक्यात ४०५ रुग्ण उपचार घेत आहेत.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजवर ३३ हजार ९५० रुग्ण कोरोनामुळे बाधित आढळले आहेत. मात्र, यातून तब्बल २६ हजार रुग्णांनी या जीवघेण्या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे, तर सध्या ७ हजार ४४६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट ७६.६५ टक्के असून, मृत्यूदर १.४२ टक्के आहे.

वसईकरांनाही दिलासा वसई-विरार क्षेत्रामध्येही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिका हद्दीत आजवर ५४ हजारपेक्षा अधिक लोक बाधित आढळले आहेत, मात्र त्याचवेळी तेथेही कोरोना संकटावर मात करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वसई-विरारमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. 

टॅग्स :palgharपालघर