शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 717 पैकी केवळ 240 शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:06 IST

पहिल्या दिवशी फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती : पालक-विद्यार्थ्यांमध्ये अद्याप कोरोना संसर्गाची भीती 

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २२ मार्चपासून बंद असलेल्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ७१७ शाळांपैकी केवळ २४० शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात ९ ते १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ५५५ विद्यार्थी म्हणजेच फक्त ६.९८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये उपस्थिती नोंदविल्याने अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची जोखीम उचलण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील बंद असलेल्या शाळा सोमवारपासून अखेर सुरू होत ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. शाळा चालू होणे ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगली बाब असल्याने प्रत्येकाने स्वतःची स्वत:च काळजी घ्यायला हवी. शाळा सुरू झाल्यामुळे एक चांगले वातावरण तयार होईल व याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे काही शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी अजूनही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यात इच्छुक नसल्याचे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत असले तरी नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण राज्यात सापडले आहेत. पालघर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यात नव्या स्ट्रेनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून जिल्ह्याच्या जवळ असलेल्या मीरा-भाईंदरमध्येही एक रुग्ण सापडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २५ हजार ५५५ विद्यार्थ्यांनीच शाळेत आपली उपस्थिती नोंदविल्याने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.

शिक्षक-कर्मचारीही आढळले होते बाधितजिल्ह्यात ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या ७१२ शाळा असून १ लाख ७८ हजार ६०७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर ९ हजार ३९३ शिक्षकांपैकी ३ हजार ३१३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५९ शिक्षक बाधित आढळले, तर १ हजार २४७ शिक्षकेतर कर्मचारी असून त्यापैकी १३९ जणांची चाचणी करण्यात आली असता एक जण बाधित आढळून आला होता.