शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेती उपसा, फोफावणारी अतिक्रमणे मुळावर, वसईचे नष्टचर्य सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 23:36 IST

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे.

वसई : वसई तालुक्याच्या पश्चिमेला निसर्गरम्य असा सागरी किनारा लाभला असला तरी वसई खाडीत बिगर क्रमांकाच्या पडावांमधून होत असलेला बेकायदा रेती उपसा, किनाऱ्यालगत फोफावत असलेली परप्रांतियांची अनिधकृत वस्ती, अतिक्रमणे आणि कायम निर्मनुष्य दिसून येणारी सुरु ची बाग यामुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण होण्याचा संभव असून भारत-पाक संबंधांमधील तणावाच्या पाशर््वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पश्चिम किनारपट्टीवर पोलिसांची गस्त ठेवण्याची आणि किनारपट्टीवरील गैरबाबींवर कारवाई करण्याची मागणी ’कोळी युवाशक्ती’ने केली आहे. यासंदर्भात संघटनेने वसई पोलिसांनी निवेदन देऊन कोणत्या बाबी सागरी सुरक्षेला बाधक ठरू शकतात, याबाबत माहिती दिली.भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढता तणाव व दहशतवादाचे असलेले सावट लक्षात घेऊन मुंबईसह देशभरात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाशर््वभूमीवर सागरी सुरक्षेबाबतचे एक निवेदन कोळी युवाशक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी वसई पोलिसांना दिले असून सागरी सुरक्षेला बाधक ठरण्याचा संभव असलेल्या किनारपट्टीवरील काही गैरबाबी पोलिसांच्या निदर्शनास आणल्या आहेत. वसईच्या खाडीत अनिर्बंधपणे बेकायदा रेती उपसा सुरू आहे. रेती उपसा करणाऱ्या पडावांवर कोणत्याही प्रकारचे नोंदणी क्र मांक नसतात. शिवाय या पडावांवर काम करणारे मजूर हे परप्रांतीय असतात. त्यांच्याकडे त्यांची ओळख पटविणारे पुरेसे पुरावेही नसतात. कस्टम आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यालयाच्या समोरील खाडीतून या बेकायदा पडावांची ये-जा सुरू असते. यावर कोणत्याही यंत्रणेचा वचक नाही. त्यामुळे याठिकाणच्या बेकायदा पडावांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेकायदा पडावांवर आणि त्यावर काम करणाºया परप्रांतीय खलाशांवर कारवाई करण्याची मागणी सौदिया यांनी केली आहे. मध्यंतरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने वसई खाडीत कारवाई करून अशा प्रकारचे बेकायदा पडाव आणि मजुरांना ताब्यात घेतले होते, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणली आहे.वसई कोळीवाड्यातील शासकीय गोदामांच्या मागे बेकायदा वस्ती वेगाने फोफावत आहे. या ठिकाणी कोण, कुठून येतो यावर कसलाही धरबंद राहिलेला नाही. या भागात गुन्हेगारी पाशर््वभूमीच्या इसमांचा वावर असून ही बाब सागरी सुरक्षेकरिता धोकादायक ठरू शकते. असे असतांनाही याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्था चिरीमिरीच्या मोबदल्यात या भागातील बेकायदा वास्तव्य करून असलेल्यांना वीज, पाणी, रेशनकार्ड अशा सर्वप्रकारच्या सुविधा पुरवितात. या भागात पोलिसांची गस्त ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. पाचूबंदर येथे हिंदू स्मशानभूमीच्या मागे स्थानिक मच्छिमारांच्या बोटींची कामे चालतात. या बोटींवर पावसाळ्याच्या काळात बोटींतील मशिनरीच्या किंमती भागांची चोरी होण्याचे प्रमाण वाढीस लागले असून आजूबाजूला वाढत असलेल्या बेकायदा वस्तीतील गुन्हेगारी पाशर््वभूमीचे इसम या चोºया करत असाव्यात असा संशय आहे. शिवाय शासकीय गोदामांच्या आजूबाजूला गर्दुल्ल्यांचाही सुळसुळाट झाला आहे.