शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

स्मशानाला जीवनदानाचे जंक्शन बनवू या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 10:49 PM

अवयवदान जनजागृती; स्मशानभूमीतच केले कार्यक्रमाचे आयोजन; कला शिबिर, स्पर्धाही संपन्न

पालघर : मृत्यूपश्चात स्मशानाला अंतिम स्थानक म्हणण्यापेक्षा देहदान, अवयवदान करून स्मशानाला जीवनदानाचे जंक्शन बनवू या, असे आवाहन सफाळ्यात आयोजित अवयवदान जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले. ‘चला बदलूया’ या देहदानाच्या आगळ्यावेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमाला समाजातून चांगला प्रतिसाद लाभला.अवयवदानाचा महत्त्वपूर्ण संदेश जनमानसात रुजावा, त्याचा प्रसार व्हावा यासाठी मीनाताई मधुकर राऊत कला संकुल सफाळे, कॅम्लिन मटेरियल आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन, मुंबई या संस्थांनी सफाळे येथे या कार्यक्र माचे आयोजन केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन प्रत्यक्ष स्मशानभूमीतच करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ज्या ठिकाणी आपला देह जाळून नष्ट केला जातो, तेथेच आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे महत्त्व समजावून सांगत अवयवदानासाठी प्रेरित करण्याची संकल्पना लोकांमध्ये रुजवण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता.अपघातात मृत्यू पावलेल्या अनेक लोकांचे सुस्थितीत असलेले अवयव जाळून नष्ट केले जातात. पण, तेच जर दान करण्यात आले तर अंधांना दृष्टी मिळू शकते, अनेक दिव्यांग आपल्या अपंगत्वावर मात करीत सुस्थितीतील आयुष्य जगू शकतात. देहदानाचे अगदीच अत्यल्प असलेले प्रमाण वाढावे हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सफाळ्याच्या स्मशानभूमीत कला शिबिर, कला स्पर्धा आणि कला प्रदर्शन आयोजित केले होते. महिला, विद्यार्थी, शिक्षकांनी या कार्यक्र मात सहभाग घेतला. यावेळी अमृता शेरगिल यांचे जीवनपट मांडणारे दोन अंकी नाटकांचे सादरीकरण केले गेले.जिल्हास्तरीय निबंधस्पर्धादेहदान व अवयवदान या विषयावर जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत माध्यमिक विद्यालय भगिनी समाज, पालघर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता योगेश वर्तक यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रसिद्ध साहित्यिका, लेखिका वीणा गवाणकर यांच्या शुभहस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक, कॅम्लीन कोकियोतर्फे पोस्टर कलर आणि रोख ५ हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Organ donationअवयव दान