शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेन डेड महिलेच्या अवयवदानामुळे तीन जणांना जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 14:52 IST

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात ४८ वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अवयवदानाच्या परवानगीमुळे तीन जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली.

भाईंदर - नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात ४८ वर्षीय महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अवयवदानाच्या परवानगीमुळे तीन जणांना जीवनदान मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली. ब्रेनडेड झालेली महिला विरार येथील रहिवासी होती. 

ब्रेनडेड महिला 22 डिसेंबर 2018 रोजी चक्कर येऊन पडली. यानंतर तिला त्वरीत स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ती कोमात गेल्याने तेथील डॉक्टरांनी तिला सुसज्ज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. यानंतर त्या महिलेला मीरारोड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुमारे 9 दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना अखेर डॉक्टरांनी तिला 31 डिसेंबर 208 रोजी ब्रेनडेड घोषित केले. त्याचवेळी डॉक्टरांनी त्या महिलेच्या नातेवाईकांना अवयव दानाबाबत माहिती देत अवयवदान करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत त्या महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाला त्वरीत परवानगी दिली. यामुळे वेळ न दडवता त्या महिलेची एक किडनी याच रुग्णालयातील एका रुग्णाला, यकृत मुंबईच्या खासगी रुग्णालयातील रुग्णाला तर डोळे (कॉर्निया)  मुंबईच्याच रोटरी क्लबच्या आय बँकेला दान करण्यात आले. 

या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाल्याने त्यांना नवीन वर्षात अमूल्य भेट मिळाली. तर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्या महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाची दिलेली परवानगी प्रशंसनीय असल्याचे हिरवाणी यांनी सांगितले. मृत्युपश्चात एका मृत शरीरातील अवयवदानामुळे किमान सात जणांना जीवनदान मिळू शकते. भारतात आजही लाखो रुग्ण अवयव दानाच्या प्रतीक्षेत असून अजूनही अवयवदानाविषयी अनेक गैरसमज असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारdoctorडॉक्टर