शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

तीन अपत्यांचे प्रकरण महिनाभरात निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 05:34 IST

बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या अध्यक्षांविरोधात तीन अपत्य असल्याप्रकरणी १९ सप्टेंबरला सुनावणी घेऊन एका महिन्यात प्रकरण निकाली काढा असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्याच्या सहकार खात्याला दिले आहेत.

- शशी करपे वसई : बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या अध्यक्षांविरोधात तीन अपत्य असल्याप्रकरणी १९ सप्टेंबरला सुनावणी घेऊन एका महिन्यात प्रकरण निकाली काढा असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्याच्या सहकार खात्याला दिले आहेत.सचिन परेरा यांना तीन अपत्य असल्याप्रकरणी बँकेचे सभासद कायस फर्नांडीस यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यावर बँकेचे विद्यमान अध्यक्ष सचिन परेरा यांना २००१ नंतर तीन अपत्य असल्याप्रकरणी पुणे येथील सहकार आयुक्तांनी ९ मार्च २०१७ रोजी अपात्र ठरवले होते. याप्रकरणी परेरा यांनी सहकार मंत्र्यांकडे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केला होता. त्यावर मंत्र्यांनीमे २०१७ रोजी सहकार आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.स्थगितीनंतर सुनावणी न झाल्याने सदर प्रकरण मंत्रालयात अद्याप प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांचे निधन झाल्याने ५ आॅगस्टला २०१७ रोजी अध्यक्षपदाची पुन्हा निवडणुक झाली. यात परेरा यांनी संचालक रायन फर्नांडीस यांचा पराभव करून अध्यक्षपद पटकावले. दुसरीकडे, परेरा यांच्याविरोधात तक्रार करणाºया कायस फर्नांडीस यांनी मंत्र्यांकडे असलेली तक्रारही मागे घेतली होती.न्यायमूर्ती एम. एस. सोनक यांनी सदर प्रकरणी येत्या एका महिन्यात निकाल द्या, असे आदेश राज्याच्या सहकार खात्याला दिले आहेत. इतकेच नाहीत येत्या १९ सप्टेंबरला सुनावणी घेण्याचेही निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे बंँकेला तटस्थ राहण्याचा सल्लाही न्यायमूर्ती सोनक यांनी दिला आहे. हायकोर्टाच्या निकालामुळे विद्यमान अध्यक्ष सचिन परेरा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.दरम्यान, बँकेचे अध्यक्ष सध्या वादाच्या भोवºयात सापडले असतानाच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने मागावर्गीय कर्मचा-यांवर भरती, बढतीत अ़न्याय झाल्याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. बँकेने मागावर्गीय कर्मचारी भरतीचा अनुशेष भरेपर्यंत मागावर्गीय कर्मचारी वगळून इतर कर्मचाºयांच्या भरती व बढतीवर स्थगिती देण्याची मागणी वसई शहर भाजपाचे अध्यक्ष मारुती घुटुकडे यांनी केली होती. याप्रकरणी आयोगाने चौकशी करण्याचे ठरवले असून अर्जदाराच्या निवेदनातील मुद्यांच्या अनुषंगाने आपला चौकशी अहवाल तीस दिवसाच्या आत आयोगाकडे सादर करावा, असे आदेश आयोगाचे सदस्य सचिवांनी पालघर जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय