शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

ऑर्केस्ट्रा बार कारवाई; आयुक्त उतरले रस्त्यावर, मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर ॲक्शन मोडवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 06:38 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिकेने सुरू केलेल्या बारवरील कारवाईसाठी पोलिस आयुक्त मधुकर पांडेय आणि पालिका आयुक्त संजय काटकर हेही रस्त्यावर उतरले होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिकेने ऑर्केस्ट्रा बारच्या अनधिकृत बांधकामांवर गुरुवारपासून कारवाई सुरू केली आहे. शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलिस आयुक्त मधुकर पांडेय यांनी स्वतः रस्त्यावर उतरत २ ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त करायला लावले, तर काशीमीरा भागातील १५ बार - लॉजना पालिकेने कारवाईसाठी नोटिसाही बजावल्या आहेत. 

नशेचा बाजार मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या आदेशानंतर मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी शहरातील ऑर्केस्ट्रा बार, लॉज आदींच्या अनधिकृत बांधकामांचा आढावा घेऊन कारवाईचे आदेश दिले. गुरुवारी मीरा रोडच्या शीतलनगर येथील ऐश्वर्या, बिंदिया व टाइमलेस,  कनकिया नाका येथील अंतःपुरा  आणि नयानगरमधील आर के इन बार - लॉज अशा ५ बारच्या  बेकायदा पत्रा शेड, बार, किचन आदी वाढीव अनधिकृत बांधकामांवर केली गेली. शुक्रवारी  काशीमीरा महामार्गावरील संगीत ऑर्केस्ट्रा बार पूर्ण जमीनदोस्त केला.

मीना ढाबा, केम छो, स्टार नाइट, नाइट लवर, के नाइट, सत्यम पॅलेस, सेटरडे नाइट, माय होम, सिझन हॉटेलचे शेड, तसेच वाढीव बांधकाम तोडले गेले. उपायुक्त रवी पवार, अतिक्रमण विभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी प्रभाकर म्हात्रेंसह कनिष्ठ अभियंता, कर्मचारी यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली. 

दोन बार पूर्णपणे जमीनदोस्त शनिवारी महापालिका आयुक्त संजय काटकर व पोलिस आयुक्त मधुकर पांडेय हे स्वतः कारवाईसाठी उतरले होते. काशीमीरा महामार्गावरील केम छो आणि एमपी पॅलेस हे दोन ऑर्केस्ट्रा बार जमीनदोस्त केले. केम छो ऑर्केस्ट्रा बारचे थोडे वाढीव बांधकाम शुक्रवारी तोडले होते, परंतु बार पूर्ण जमीनदोस्त न केल्याबद्दल आरोप होऊ लागल्यानंतर शनिवारी तो पूर्ण तोडण्यात आला. यावेळी पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाडही उपस्थित होते.

टॅग्स :mira roadमीरा रोडEknath Shindeएकनाथ शिंदे