शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कामगाराच्या मृत्यूला जबाबदार असणारे मोकाट

By admin | Updated: May 28, 2017 02:59 IST

तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस

- पंकज राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस झाल्यानंतरही त्याची नोंद योग्य रित्या पोलिसांनी केलेली नाही. तसेच त्याला जबाबदार असणारे अधिकारीही त्यामुळे मोकाट राहीले आहेत. या तपासाला गती मिळाली नसून या घटनेची तारापूर पोलिसात अजूनही या घटनेची नोंद हलगर्जी इतकीच आहे. तर किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेण्याचे नियम धाब्यावर बसविल्यानेच हा मृत्यू घडला असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यानुसार तपास करून त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे७ एप्रिलला अंदाजे सहा टन वजनाची व सात फुट उंचीची किरणोत्सर्गी घनकचऱ्याने (स्पेन्ट फ्यूएल) ने भरलेली टाकी तारापुरच्या अणुऊर्जा केंद्र एक व दोन मधून जवळच असलेल्या भाभा अणु संशोधन केंद्रा (बी .ए .आर .सी.) मध्ये फोर्कलिफ्ट वरुन पुढील प्रक्रि ये करीता नेण्यात येत होत. मात्र, ही टाकी उंच असल्याने फोर्कलिफ्ट च्या चालकला २५ ते ३० फुटाच्या पुढील भागच दिसत नव्हता तर सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेसाठी पुढे मागे पायलट वाहन तसेच ट्रॅफीक कंट्रोलच्या मदतीसाठी कुणीही न ठेवल्यानेच कोरे या निष्पाप कर्मचाऱ्याचा (जे पुढील वर्षी ३० नोव्हेंबर ला सेवा निवृत्त होणार होते) नाहक बळी गेला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तारापुर अणु ऊर्जा केंद्र आयएसए १८००१ प्रमाणित असल्याने धोकादायक किरणोत्सर्गी घन कचरा (स्पेन्ट फ्यूएल) सारख्या वस्तुंची फोर्कलिफ्ट वरु न वाहतूक करतांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आणि ए. इ. आर. बी. च्या नियम आणि मापदंडानुसार स्टॅँडर्ड आॅपरेटिंग प्रोसीजर (एस.ओ.पी ) चे काटेकोर पणे पालन होणे अपेक्षित होते त्याची अंमलबजावणी केली की, नाही? त्याची जबाबदारी कुणावर होती याचा तपास एन. पी. सी. आय . एल. च्या वरिष्ठ पातळीवरून आणि पोलिसांकडून तत्परतेने होणे गरजेचे असतांनाही दिरंगाई होत आहे.- तारापुर पोलिसांनी दि १० एप्रिलला तारापुर अणु ऊर्जा केंद्र प्रशासनला पंधरा प्रश्नाचे पत्र दिले आहे. त्या लाही आता ४६ दिवस झाले परंतु त्या पत्राचे उत्तर अजून देण्यात आले नाही. त्यामुळेच दोषीवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. व कोरे कुटुंबाला न्यायही मिळालेला नाही.