शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

खासदारांच्या हस्ते लोकार्पण केलेल्या खुल्या व्यायामशाळेची झाली दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 05:32 IST

१५ दिवसांपूर्वीच झाले उद्घाटन : अर्नाळा ग्रामपंचायतीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप

वसई : अर्नाळा ग्रामपंचायतीने नुकताच मोठा गाजावाजा करत अर्नाळा समूद्रकिना-यावर खुल्या व्यायामशाळेचे उद्घाटन खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते केले होते. मात्र, अवघ्या १५ दिवसात तिची दुरावस्था झाल्याने, या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरले गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अर्नाळा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्र म राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकण पर्यटन विकास कार्यक्र म, निर्मल सागर तट अभियान, ठक्करबाप्पा योजना अंतर्गत विविध विकासकामांचा पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावीत यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा २६ नोव्हेंबर रोजी अर्नाळा सुरूची बाग येथे करण्यात आले होते. यात नियोजित उपक्र मात कोकण पर्यटन विकास कार्यक्र म अंतर्गत खुला रंगमंच बांधणे, पर्यटकांसाठी वाहनतळ पेव्हर ब्लॉक लावणे, समुद्रकिनाऱ्यावर जाणारा रस्ता काँक्रि टीकरण करणे तसेच निर्मल सागरतट अभियानांतर्गत खूल्या व्यायामशाळेचे लोकापर्ण व ठक्करबाप्पा योजनेंतर्गत फॅक्टरीपाडा रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश होता. याचे भुमीपूजन व लोकार्पण होऊन अवघे पंधरा दिवसही उलटले नसताना खूल्या व्यायामशाळेसाठी लावण्यात आलेल्या व्यायामाच्या सामानाची मोडतोड झालेली पहायला मिळत आहे. निकृष्ठ दर्जाचे पाईप व तकलादू सामान यासाठी वापरले गेल्यामूळे जागोजागी वेल्डींग उखडले गेले आहेत. लहान मूलांना बसण्याच्या खुर्चाही तुटून खाली पडलेल्या पहायला मिळत आहेत. यामुळे दुर्घटना घडू शकते. अवघ्या पंधरा दिवसात अशी दुरावस्था झाल्यामुळे या कामात भ्रष्टाचार झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत असून याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

यासाठी २ लाख ३० हजार रूपये प्ले ग्लोबल या कंपनीला देण्यात आले होते. मात्र हे सामान ज्या जागेत बसविण्यात येणार होते, त्या जागेबद्दल वनविभागाची परवानगी मिळत नव्हती म्हणून हा खूल्या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा रखडला होता असे सांगण्यात आले.याबाबत संबंधीत कंपनीविरोधात निकृष्ठ दर्जाचे सामान वापरून दिशाभूल केल्याबद्दल अर्नाळा ग्रामपंचायतीकडून काय कारवाई करण्यात येणार आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, कंपनीने काम उत्तम असल्याचे सांगितले.प्ले ग्लोबलचा दर्जा उत्तमयाबाबत उपसरपंच महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, खूल्या व्यायामशाळेसाठी सातीवली येथील नामांकित प्ले ग्लोबल या कंपनीचे मालक अगरवाल यांच्या कडून हे सामान बनवून घेतले असल्याचे सांगितले. जास्त वजन दिल्यामुळे यातील काही भागाची मोडतोड झाली असल्याचे त्यांनी सांगत, निकृष्ठ दर्जाचे सामान वापरले गेल्याचा इन्कार केला. अर्नाळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पंकज संख्ये टेंडर मागविल्यानंतर कंपनीकडून हे सामान मार्च २०१८ ला मागविल्याचे सांगितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार