शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भिवंडी-वाडा महामार्गावर उरले केवळ खड्डेच; राजकीय पक्षांची बघ्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:35 IST

ठेकेदाराचे उखळ पांढरे?, आंदोलक कार्यकर्ते वेठीस

वाडा : भिवंडी-वाडा रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे नित्याचीच वाहतूककोंडी व लहान-मोठे अपघात होत आहेत. यातून नागरिकांची सुटका व्हावी आणि रस्ता गणपती सणापूर्वीवाहतुकीस योग्य व्हावा म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुडूस नाक्यावर अलीकडेच रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता गणपती सणापूर्वी वाहतुकीस योग्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, मात्र थातूरमातूर खड्डे भरले गेले, त्याने प्रश्न काही सुटलेला नाही. आजही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याचे दिसून येत आहे.

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने दि.१८ रोजी रास्ता रोको आंदोलन केले गेले होते, परंतु आंदोलन संपताच आंदोलकांवर गुन्हे दाखल करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यात हा विषय बाजूला राहिल्याने या वर्षीही गणपती बाप्पांचे आगमन खड्डे तुडवतच झाले. याचे राजकीय पक्षांना काहीही सोयरसुतक नसल्याने थातूरमातूर खड्डे भरून ठेकेदाराने मात्र उखळ पांढरे करून घेतल्याचा आरोप केला जात आहे.

वाडा-भिवंडी-मनोर या महामार्गावरील डाकिवली फाटा ते वाडा या २० कि.मी. अंतराच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचा ठेका जय भारत कंस्टक्शन कंपनीला ३ कोटी रुपयांना देण्यात आला असून यामध्ये त्यांनी उन्हाळा व पावसाळा या दोन्ही मोसमात रस्त्याची दुरुस्ती करायची आहे. परंतु सद्यस्थितीत सुरू असलेले खड्डे भरण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे केल्याने हा रस्ता खड्ड्यात गेला आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून दोन खासदार, तीन आमदारांचा हा तालुका, मात्र रस्त्यांसह अनेक सोयी-सुविधांपासून कोसो मैल दूर आहे.भिवंडी-वाडा-मनोर रस्ता बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर सरकारने सुप्रीम इन्फास्टक्चर या कंपनीला दिला होता, मात्र १० वर्षे लोटल्यानंतरही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. १६ कि.मी. अंतरावर वन विभागाची हद्द असल्याने तेथील रस्ता दुपदरीच आहे. देहजे, पिंजाळ या नद्यांवरील पुलांची कामे आजपर्यंत अपूर्णच आहेत. वाडा-भिवंडी-मनोर महामार्गांचे काम निकृष्ट झाल्याने प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता खड्डेमय होतो व दरवर्षीदुरुस्तीवर करोडो रुपये खर्च होतात. या वर्षीही तीच अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. त्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दि.२१ आॅगस्टपर्र्यंत रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून सद्यस्थितीत या रस्त्याची चाळण झालेली आहे.या महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम नियमित सुरू असून रस्त्यावर पाणी साचत असल्याने कामात अडथळा निर्माण होत आहेत. परंतु १०० टक्के काम पूर्ण करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. - ए.एम. बरसट, शाखा अभियंता, बांधकाम विभाग, वाडा

रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र रस्त्याचा पाया मजबूत नसल्याने एका जागेवरील खड्डा भरला की, लगेच दुसऱ्या ठिकाणी खड्डा पडतो आहे. २१ तारखेपर्यंत सर्व खड्डे भरले होते. त्याची व्हिडीओ क्लिपही आम्ही बनवली आहे. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे पडत आहेत. तरीही रस्ता लवकरच लवकर सुस्थितीत करण्यात येईल. - विवेक पवार, ठेकेदार

टॅग्स :Potholeखड्डे