शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी केवळ 5 टक्के भूसंपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 11:51 IST

एमएसआरडीसी : पुणे रिंग रोडसाठी ५० टक्क्यांहून अधिक अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महाप्रदेशातील पहिल्या प्रवेश नियंत्रित अशा विरार - अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सुरू केली आहे. मात्र, सद्यस्थितीत या मार्गिकेसाठी सुमारे पाच टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मुंबई महाप्रदेशात जमिनीचे दर अधिक असल्याने भूसंपादन करताना यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचवेळी पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने तब्बल ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन केले आहे.

एमएसआरडीसी विरार ते अलिबागदरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा बहुउद्देशिय वाहतूक मार्ग उभारणार आहे. यातील पहिल्या टप्प्यात वसई येथील नवघर ते पेण तालुक्यातील बलावली गावादरम्यान ९६ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाईल. या महामार्गासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यात भूसंपादनासाठी २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील ९६ किमी लांबीच्या मार्गाचे काम ११ पॅकेजमध्ये केले जाणार आहे. या अकरा पॅकेजच्या उभारणीसाठी १९ हजार ३३४ कोटी रुपयांच्या निविदा एमएसआरडीसीने यापूर्वीच काढल्या आहेत. आता १८ एप्रिलला या निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पासाठी भूसंपादनात अडथळे येत आहेत.  

जमिनीचे दर अधिक म्हणून...मुंबई महाप्रदेशात जमिनीचे दर अधिक असल्याने भूसंपादनावेळी दरांवरून जमीन मालकांकडून हरकती दाखल केल्या जात आहेत. तसेच काही भागात प्रकल्पासाठी जमिनी देण्यास नकार दिला जात आहे. त्यातून भूसंपादन करताना यंत्रणांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातून सद्यस्थितीत केवळ ५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, मेअखेर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. निम्म्याहून अधिक जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया लवकरच पूर्ण करून प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 

टॅग्स :MumbaiमुंबईalibaugअलिबागVirarविरारVasai Virarवसई विरार