शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारात मरण पावलेले एक नालासोपाऱ्यातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 19:34 IST

मुंबई जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरण

नालासोपारा (मंगेश कराळे) :- सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास जयपूर एक्स्प्रेसमध्ये झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. चेतन सिंह या आरपीएफ जवानाने गोळीबार केला. या घटनेत तीन प्रवासी व एका आरपीएफ जवानाचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले. या गोळीबारात मरण पावलेल्या प्रवाशापैकी एक जण नालासोपारा शहरातील आहे. अब्दुल कादर मोहम्मद हुसेन भानपुरावाला (५०) असे त्यांचे नाव असून ते राहत असलेल्या परिसरात व इमारतीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नालासोपाऱ्याच्या आचोळे रोडवरील तेज प्रतिभा सासोयटीतील ए विंगच्या ४०२ नंबरच्या सदनिकेत राहत होते. ते बोरी समाजातील असल्यामुळे मोहरमनिमित्त मुळगावी भानपुर येथे गेले होते. त्यांना मुलगा हुसेन आणि मुलगी जैनत असे दोन मुले आहेत. हुसेन हा दुब‌ई येथे कामानिमित्त असुन त्यांची पत्नी देखील सध्या मुलांसोबत दुबई येथे आहे. तर मुलगी जैनत हिचे लग्न झाले असून ती अहमदाबादला राहते. त्यांचा मुलगा हुसेन हा दुबई वरून निघाला असल्याचेही कळते.

अब्दुल भानपुरावाला यांचे गालानगर येथे डायपर विक्रीचे दुकान आहे. पुढच्या आठवड्यात ते दुबईला पत्नी व मुलांकडे राहण्यासाठी जाणार होते. मात्र सोमवारी झालेल्या भ्याड गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. भानपुरवाला हे राहत असलेल्या सोसायटीचे सचिव म्हणून काम पाहत होते. तसेच त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ व मदत करण्यात सदैव तत्पर असल्यामुळे बोरी समाजामध्ये समाजपयोगी उपक्रमात सतत सहभागी होत असायचे. त्यांच्या अचानक जाण्याने तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारIndian Railwayभारतीय रेल्वेFiringगोळीबार