शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 02:59 IST

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे.

शशी करपे वसई : आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे.मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ४८.५ मीटर लांबीच्या जुन्या वरसोवा पुलाला ४३ वर्षे उलटून गेली आहेत. २०१४ साली पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्यापासून, या मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्या वेळी नवीन गर्डर बसविण्याच्या कामासाठी तब्बल सहा महिने लागले होते. तेव्हापासून पूल कमकुवत असल्याने, दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार बंद करण्यात येत आहे. गर्डर बदल्यानंतर पूल पुन्हा नादुरुस्ती झाल्याने, १६ सप्टेंबर २०१६ ते १८ मे २०१७पर्यंत पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात नव्या पुलावरून एकेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागून वाहनचालकांना अडकून पडावे लागत होते. या पुलाची दुरुस्ती लवकर करून, वाहनांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी विविध पक्षांना ‘रास्ता रोको’ आंदोलनेही केली होती.१९ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता याच पुलावरून हलक्या आणि जड वाहनांसाठी वेगवेगळ््या रांगा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा पूल जड वाहनांच्या वाहतुेकीसाठी कितपत टिकेल, असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. नेमका आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या पुलाची वेट टेस्टिंग घेण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी सहा तास चालणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सकाळी ८ वाजल्यापासून चाचणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.नव्या पुलावरून वाहतूकजुना पूल बंद केल्यानंतर नव्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक पंधरा पंधरा मिनिटांच्या फरकाने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. पूल बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूककोंडी होती, तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात हलकी आणि अवजड वाहने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो.या अनुभव लक्षात घेऊन महामार्ग वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वरसोवा खाडी पूल, जी. एन. मोटेल, रॉयल गार्डन, एस. पी. धाबा, लोढा धाम व चिंचोटी नाका या सात ठिकाणी नाके तयार करण्यात येणार आहेत. या वेळी ७५ पोलीस कर्मचारी, ५० बॅरीकेटस आणि २०० कोन वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.