शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महानगरपालिकेतील  29 गावे वगळण्यासाठी हरकती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 19:27 IST

Vasai-Virar Municipal Corporation : सद्य स्थितीत कोविड-19 चा प्रादूर्भाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे शक्य होणार नाही. 

वसई - वसई-विरार महानगरपालिकेतून  29 गावे वगळणेबाबत 8 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील 29 गावातील सर्व संबंधित व्यक्ती, नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, संघटना यांनी या विषयीच्या आपल्या लेखी सूचना व हरकती 25 नोव्हेंबर 2020 पर्यंत सादर कराव्यात असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी कळविले आहे.

सद्य स्थितीत कोविड-19 चा प्रादूर्भाव विचारात घेता प्रत्यक्ष सुनावण्या घेणे शक्य होणार नाही.  त्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांना आपल्या लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर करण्यासाठी पुरेशी संधी देणे आवश्यक असल्याने  हरकती, सूचना, निवेदने लेखी स्वरुपात स्विकारण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केला आहे व अधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे. 

लेखी सूचना व हरकती दाखल करण्याचा कालावधी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2020 (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) असा राहील. सूचना व हरकती दाखल करण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे 1) उपविभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई जि.पालघर 2) उपायुक्त (सामान्य), वसई-विरार महा नगरपालिका उपायुक्त यांचे कार्यालय, विरार जि.पालघर 3) निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जि.पालघर 4) प्रादेशिक उपसंचालक, नगरपालिका प्रशासन विभाग, कोकण भवन नवी मुंबई. 

तरी उक्त कार्यक्रमानुसार वसई-विरार महानगरपालिकेतून 29 गावे वगळण्याबाबत संबंधित इच्छुक व्यक्ती, संस्था, लोकप्रतिनिधी यांनी उपरोक्त नमुद ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत लेखी हरकती, सूचना, निवेदने सादर कराव्यात असे विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार