शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही; मीरा भाईंदर सकल मराठा समाजाचा निर्धार 

By धीरज परब | Updated: October 30, 2023 20:09 IST

सरकारने शब्द देऊन सुद्धा निर्णय न घेतल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

मीरारोड -  महायुती शासनाने मराठा समाजाला ४० दिवसात आरक्षणवर निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन  सुद्धा शब्द न पाळल्याने मीरा भाईंदर मधील मराठा समाजाने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत १ नोव्हेम्बर पासून साखळी उपोषण सुरु करणार असे जाहीर केले आहे. मीरा भाईंदर सकल मराठा समाजची बैठक रविवारी पार पडली . या बैठकीत यावेळी माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम , माजी शिक्षण समिती समभापती सुरेश दळवी, माजी नगरसेवक अनिल भोसले सह अमोल जाधवराव, सुभाष काशीद, जयराम मेसे ,लक्ष्मण पाटील, रमेश पवार, मनोज राणे, देवदास सावंत, सचिन पोपळे, कृष्णा  दरेकर, अनिल ताटे, प्रकाश नागणे, अंकुश मालुसरे, संतोष गोळे, सुहास सावंत, रवींद्र भोसले, गणेश वाडिले , प्रवीण उत्तेकर, निलेश भालेकर, अमोल मोरे, प्रशांत सावंत, विनोद जगताप, विजय निकम आदी बैठकीत सहभागी झाले होते . सर्व राजकीय पक्षां मधील मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सरकारने शब्द देऊन सुद्धा निर्णय न घेतल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑक्टोबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.  त्यांना पाठिंबा देत व १ नोव्हेम्बर पासून स्वातंत्र्यवीर सावरकर चौक , गोल्डन नेस्ट येथे साखळी उपोषण करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला . मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्या . राज्यातील मराठा समाज एकवटला असून आता मराठे माघार घेणार नाहीत असा निर्धार यावेळी केला गेला. मराठा समाजाचे असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही दबावाखाली न येता आरक्षण द्यावे . आरक्षणाबरोबरच सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठा तरुण तरुणींना लाभ होईल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले गेले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMaratha Reservationमराठा आरक्षण