शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता ६१ दिवस मासेमारी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:54 IST

१ जून ते ३१ जुलै या आगामी ६१ दिवसांच्या कालावधी करिता सागरी मासेमारी बंदीचा कालावधी असणार आहे

बोर्डी : १ जून ते ३१ जुलै या आगामी ६१ दिवसांच्या कालावधी करिता सागरी मासेमारी बंदीचा कालावधी असणार आहे. तथापी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्तालय ठाणे-पालघर या अंतर्गत येणारी उत्तन, वसई, एडवन, सातपाटी आणि डहाणू या परवाना विभागातील सुमारे बावीसशे नोंदणीकृत यांत्रिक बोटी आहेत. तर पारंपरिक बोटींना ही बंदी लागू नसली तरी या काळात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे खबरदारी बाळगत पारंपरिक बोटीही किनाºयावर शाकारण्यात येतात.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत १ जून ते ३१ जुलै हा ६१ दिवसांचा बंदीचा कालावधी आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याकरिता पालघर येथे सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय आयुक्तालयाचे कार्यालय आहे. त्या अंतर्गत पाच परवाना अधिकाºयांचे कार्यक्षेत्र आहे. त्या नुसार उत्तन (वाशी ते वसई), वसई(पाचूबंदर ते अर्नाळा), एडवन(वडराई ते एडवन), सातपाटी ( शीरगाव त तारापूर) आणि डहाणू विभागात वरोर ते झाई) या सागरी क्षेत्रांचा समावेश आहे. या मुख्यालयाअंतर्गत २२०० यांत्रिक मासेमारी बोटींची नोंदणी झालेली आहे. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असल्याने ही बंदी लागू असते. शिवाय जोराचा पाऊस आणि वादळी वारे यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मच्छीमार या काळात हा नियम कसोशीने पाळतात. तथापि किनार्यावर नांगरलेल्या बोटी प्लास्टिक किंवा झावळ्यांंनी शाकारण्यात येतात.पालघर जिल्ह्यातील सागरी क्षेत्र मासेमारीचा गोल्डन बेल्ट समजला जातो. पापलेट, सरंगा, घोळ, दाढा, कोळंबी, शिवंड आदी विविध जातींचे मासे विदेशी चलन प्राप्त करून देतात. मात्र, मागील दशकापासून माशांच्या प्रमाणात कामालिची घट झाल्याने या व्यवसायिकांवर आणि त्यावर अवलंबून पूरक व्यावसायिक आर्थिक झळ सोसत आहेत. शिवाय ऐन मासेमारी हंगामात येणारी वादळांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागते. तर डिझेल दरवाढ, त्याला शासनाकडून योग्य प्रमाणात न मिळणारी सबिसडी, हमीभावाचा अभाव या मुळे मच्छिमार आर्थिक संकटात आहेत.