शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार परवान्यासाठी पालिकेने पाठवल्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:18 IST

वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. फी भरून व्यवसाय परवाना घेण्यासाठी पालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे.

विरार - वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांना महापालिकेचा व्यवसाय परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. फी भरून व्यवसाय परवाना घेण्यासाठी पालिकेने व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. यासाठी पालिकेने व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा, कार्यवाही / कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दरवर्षी व्यवसाय परवाना फी भरून त्यांचे नूतनीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने नोटिसीत नमूद केले आहे.महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९, कलम ३७६ प्रकरण १८ नुसार वसई-विरार महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांनी महापालिकेची फी भरून व्यवसाय परवाना घेणे बंधनकारक केले आहे. तसेच दरवर्षी फी भरून त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे.वसई-विरार शहर महापालिका कार्यक्षेत्रात जे व्यावसायिक महापालिकेचा कायदेशीर परवाना न घेता व्यवसाय करीत आहेत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ३७६, ३७६ (अ) अंतर्गत नोटीस बजावण्याची कार्यवाही परवाना विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यानंतरही नोटिसीच्या मुदतीत व्यावसायिकांनी वसई-विरार महापालिकेचा परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्यास अशा व्यवसायांच्या जागा मोहोरबंद (सील) करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.व्यापाऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन पालिकेने व्यवसाय परवान्याच्या दरात ५० टक्के कपात केली होती. त्यामुळे नव्या दरानुसार व्यापाऱ्यांना सुधारित नोटिसा पाठविण्यात येत आहेत. मात्र, यासाठी लावलेली कलमेही चुकीची आहेत. त्यानुसार, कर आकारणी करता येत नाही, असा दावा कायदे अभ्यासकांनी केला आहे. काय आहे कायदेतज्ज्ञांचे मत?वाढत्या आंदोलनांमुळे पालिकेने माघार घेत व्यवसाय परवाना करात ५० टक्के कपात केली असली तरी कलम ३१३ नुसार शहरातील विक्रेते, दुकानदार आणि व्यावसायिक यांना कर आकारता येत नसल्याचे कायदेतज्ज्ञ निमेश वसा यांचे म्हणणे आहे. कलम ३१३ हा नवीन व्यवसाय करणारे, व्यवसाय जर अन्य ठिकाणी स्थलांतरित केला असेल, बंद व्यवसाय नव्याने सुरू केला असेल तर लागू होतो. जे दुकानदार आणि व्यावसायिक पूर्वीपासून व्यवसाय करीत असतील, त्यांना लागू होत नाही, असे कलमात स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालिकेने ज्या कलमाआधारे नोटिसा बजावल्या आहेत, त्या चुकीच्या असल्याचे वसा यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार