शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेत पालघर जिल्हाच नाही?

By admin | Updated: February 1, 2017 02:53 IST

पालघर जिल्हा निर्मितीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी होत आला असला तरी स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या पालघर शाखेतून देण्यात येणाऱ्या कागदपत्रात

पालघर : पालघर जिल्हा निर्मितीला सुमारे तीन वर्षांचा कालावधी होत आला असला तरी स्टेट बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेच्या पालघर शाखेतून देण्यात येणाऱ्या कागदपत्रात अजूनही पालघर ऐवजी ठाणे जिल्ह्याचा उल्लेख केला जात असल्याने ही खेद जनक घटना असल्याने त्यात तात्काळ बदल करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून होत आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर विविध बँका, अनेक विभागानी आपल्या पत्त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा उल्लेख वर्षभराच्या कालावधीत संपवून पालघर जिल्ह्याचा उल्लेख केला. भारताच्या नकाशात ही स्वतंत्र पालघर जिल्ह्याचे अस्तित्व दाखविण्यात आले आहे. अशा स्थितीत राष्ट्रीयकृत अग्रणी बँक असणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या पालघर शाखेच्या कागदपत्रात मात्र अजूनही पालघर जिल्ह्या ऐवजी ठाणे जिल्हा असाच उल्लेख केला जात आहे.ह्या बँकेत जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षिका कार्यालय,जिल्हा परिषद पालघर या तीन महत्वपूर्ण विभागातील अनेक कार्यालयाची बँक खाती आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजनांचे पैसे, अनुदानेही नानाविध विभागाकडून स्टेट बँकेमार्फत देण्यात येतात.तसेच अनेक नागरिकांसह व्यापारी, कारखानदार, बिल्डरही आपला व्यवहार ह्याच बँकेतून करीत असल्याने आधार कार्डच्या वेळी बँकेचे पासबुक ग्राह्य असल्याने अनेकांच्या आधारकार्डवर आजही ठाणे जिल्हा म्हणून नमूद असल्याने ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे. (वार्ताहर)