शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैसै, गणवेश नाहीच, जि.प. शाळा सुरू होऊन झाले ६ महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:11 IST

मोखाडा : होय मी लाभार्थी हे माझे सरकार अशी जाहीरातबाजी करून महाराष्ट्र सरकार आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे.

रविंद्र साळवे मोखाडा : होय मी लाभार्थी हे माझे सरकार अशी जाहीरातबाजी करून महाराष्ट्र सरकार आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे. यावर सर्वत्र टीकेची झोड उठविली जात असतांनाच आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यातील जि.प. शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन ६ महिने झाले तरी गणवेश मिळालेले नाहीत.त्यामुळे त्यांच्यावर ‘होय मी लाभार्थी’ माझे गणवेश सरकारने लटकवले असंच म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. तालुक्यात १५८ झेडपी शाळा असून जूनला सुरु झालेल्या शाळांनी १५ आॅगस्टपूर्वी गणवेशाची एक जोडी देण्याचा नियम आहे.या वर्षी शासनाने पारदर्शक कारभाराचा गाजा-वाजा करून थेट पालक किंवा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु काही शाळांनी या निर्णयाला बासनात गुंडाळल्याने गणवेशाचा घोळ कायम आहे शासनाकडून प्रत्येकी एका गणवेशासाठी २०० रु प्रमाणे दोनचे ४०० रुपये दिले जाणार आहेत.गणवेश घेतल्याची पावती संबधित शाळेकडे सुपूर्द केल्यानंतर हि रक्कम खात्यावर जमा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे परंतु दिवसभराच्या मोल- मजूरीतून शंभर रुपये मिळत असल्याने दोन गणवेशासाठी ४०० रुपये कुठून आणायचे हा प्रश्न आदिवासी पालकांना सतावत आहे मागील वर्षी हा निधी शाळा समितीला दिला. निविदा मागवून कापड विक्रेता आणि टेलर यांची नियुक्ती केली होती. परंतु या मध्ये भ्रष्टचाराची शक्यता होती म्हणून सरकारने ही रक्कम पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला.>४०० रुपये खात्यात अद्यापही जमा नाहीचसरकारने हे ४०० रुपये पालक अथवा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम मिळाली नसल्याने पालकवर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक अधिक माहितीसाठी प्रभारी गटशिक्षण अधिकारी ए एस मोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार