शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
2
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
3
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
4
युद्धाचा भडका उडणार, अमेरिका 'या' देशात सत्तांतर घडवण्याच्या तयारीत?; विमाने रद्द, युद्धनौका, लढाऊ विमाने तैनात
5
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
6
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
7
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
8
टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले
9
काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी
10
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
11
टीम इंडियावर वनडेत नवा कर्णधार शोधण्याची वेळ! कोण घेणार शुभमन गिलची जागा?
12
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांवर टांगती तलवार; सुप्रीम कोर्टात काय होईल? इच्छुकांची घालमेल
13
VIDEO: हरलेल्या संघाच्या कॅप्टनला विचारलं- "जिंकल्यावर कसं वाटतंय?"; चूक लक्षात येताच....
14
"तू आई-वडिलांना छोट्या गोष्टी..."; फिजिओथेरपिस्टचा होणाऱ्या नवऱ्याला मेसेज, का संपवलं आयुष्य?
15
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
16
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
17
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
18
नाशिक: तस्कर टोळीतील एकाने वनपथकाच्या हाती दिल्या तुरी; बाऱ्हे वनविश्रामगृहातून ठोकली धूम
19
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
20
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
Daily Top 2Weekly Top 5

ना गर्दी... ना जत्रा...ना बम बम भाेलेचा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:06 IST

भक्तांमध्ये नाराजी : कोरोनामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी जिल्ह्यातील मंदिरे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : महाशिवरात्रीचा सण हा हिंदू धर्मात महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी उसळते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जत्रेचेही आयोजन करण्यात येते; पण या वर्षी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने जिल्ह्यातील मंदिरे भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येऊन केवळ पारंपरिक पूजा करण्यात आली. यामुळे ना गर्दी, ना जत्रा, ना बम बम भोलेचा गजर जिल्ह्यात घुमला. दरम्यान, काही मंदिरे कोरोनाचे नियम पाळून खुली ठेवण्यात आली होती.

काही मंदिरांत कोरोनाचे नियम, अटी पाळत शिवभक्तांनी बाहेरून दर्शन घेत महाशिवरात्रीचा उपवास सोडला, तर रेल्वे स्थानक, बस स्थानक, आठवडे बाजार या ठिकाणी गर्दी होत असताना मात्र मंदिर दर्शनासाठी का बंद ठेवण्यात आली, याबाबत भक्तांमध्ये नाराजीचे वातावरण होते. वसई तालुक्यात तुंगारेश्वर, गोखिवरे, विरारपाटा, पारोळ, ईश्वरपुरी अशा अनेक ठिकाणी या शिवमंदिरात महाशिवरात्री साजरी केली जाते; पण या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिरांमध्ये या वर्षी पारंपरिक पूजा वगळता इतर उत्सव बंद करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी ये-जा सुरू केली; पण प्रत्येक मंदिरावर पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांनी दर्शनासाठी प्रवेश नाकारला. त्यामुळे अनेकांनी कळस दर्शन घेतले, तर गोखिवरे शिवमंदिर समितीने ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केली होती. कोरोनाच्या वाढत्या  प्रादुर्भावामुळे या वर्षी महाशिवरात्री पर्व भक्तांनी घरी साधेपणाने साजरे केले.

काही मंदिरे खुलीया वर्षी उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने वसई तालुक्यातील मंदिरांत पारंपरिक पूजा करण्यात आली, मात्र भक्तांच्या दर्शनासाठी काही मंदिरे बंद करण्यात आली, होती तर काही मंदिरांत कोरोनाचे नियम-अटी पाळत शिवभक्तांनी दर्शन घेतले आणि महाशिवरात्रीचा उपवास सोडला. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात दर्शनासाठी ये-जा सुरू केली, पण प्रत्येक मंदिरावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही मंदिरांत कोरोनाचे नियम-अटी पाळत भक्तांनी दर्शन घेतले.

वाड्यातील शिवभक्तांनी घेतले मुखदर्शनnवाडा : तालुक्यात तिळसेश्वर, आंबिस्ते येथील नागनाथ मंदिर, घोडमाळ, कोंढले, नारे  आदी ठिकाणी शंकराची मंदिरे असून, महाशिवरात्रीदिवशी यात्रा भरून दर्शनासाठी शिवभक्तांच्या दरवर्षी लांबच लांब रांगा लागत असत, परंतु यावर्षी कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने शासनाने यात्रा बंदचे आदेश काढल्याने वाड्यातील शिवभक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करून मंदिराच्या आवारात जाऊन मुखदर्शन घेतले. nब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावलेल्या तिळसेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भरत असलेल्या एकदिवसीय यात्रेसाठी व शिवशंकराच्या चरणी लीन होण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतून भाविकांची मोठी गर्दी उसळत असते. यावर्षी मात्र शासनाने निर्बंध लादल्याने तुरळक प्रमाणात भाविक दाखल झाल्याने तिळसेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट होता.

बोर्डी आणि झाई समुद्रकिनारी साकारले वाळूशिल्पबोर्डी : महाशिवरात्रीनिमित्त डहाणू तालुक्यातील बोर्डी आणि तलासरी तालुक्यातील झाई समुद्रकिनारी महादेवाचे वाळूशिल्प साकारण्यात आली होती. यंदाही भक्तांनी ही परंपरा जोपासली. त्यामध्ये महिलांनाही योगदान दिले.डहाणूतील बोर्डी आणि झाई या समुद्रकिनारी महाशिवरात्रीला महादेवांचे वाळूशिल्प साकारण्याची परंपरा आहे. याकरिता पहाटेपासून नागरिक समुद्रकिनारी दाखल होतात. वाळू गोळा करण्यासाठी बच्चेकंपनी पुढाकार घेतला होता. महादेवाची वेगवेगळ्या आकारांची पिंड, नंदी बनविले होते. त्यानंतर शंख, शिंपले आणि फुलांनी त्याची सजावट केली होती. त्यानंतर महिलांनी या पिंडींचे विधिवत पूजन केले. त्यानंतर बच्चे कंपनींने समुद्रात पोहण्याचा आनंद लुटला. दरवर्षी बोर्डीतील वाळूशिल्पकार भास्कर दमणकर सात ते आठ फूट उंचीचे उभे वाळूशिल्प साकारतात. ते पाहण्यासाठी पर्यटकांची चौपाटीवर गर्दी जमते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी यावेळी त्यांनी शिल्प न साकारल्याने अनेकांचा हिरमोड झाला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार