शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

मेव्हण्यानेच घातला दरोडा, जीजूचेच शिवम ज्वेलर्स लुटणारा साथीदारांसह झाला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 05:11 IST

दुकानात काम करीत असलेल्या मेव्हण्यानेच आपल्या चार साथीदारांसह जीजूच्या ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ५५ लाखांचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

वसई : दुकानात काम करीत असलेल्या मेव्हण्यानेच आपल्या चार साथीदारांसह जीजूच्या ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ५५ लाखांचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दागिने आणि रोकड जप्त केली आहे.नालासोपारा पूर्वेकडील सितारा बेकरीजवळ असलेल्या शिवम ज्वेलर्सवर २३ आॅगस्टला तीनच्या सुमारास दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून मालक रुपसिंग राजपूत याला दोरीने बांधून ठेवले होते. त्यानंतर ५५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटून नेली होती. कोणताही पुरावा मिळू नये यासाठी दरोडेखोरांनी दुकानातील सीसीटीव्ही आणि डिव्हीआर लंपास केला होता. त्यामुळे दरोडेखोरांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.तपास करणाºया तुळींज पोलिसांना दुकानात काम करीत असलेला रुपसिंग राजपूत यांचा मेव्हणा मानुसिंग राजपूत (३२) याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या म्हणून त्याला ताब्यात घेऊन इंगा दाखवताच त्याने दरोड्याची कबुली दिली. त्याने आपले साथीदार छगनलाल रावल (३३, रा. वापी, गुजरात), नाहर सिंग (३५, रा. उदयपूर राजस्थान) यांच्यासह नाहरच्या दोन मित्रांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. दरोड्यात लुटलेला माल मानुसिंग याने राजस्थान येथे आपल्या बहिणीच्या घरी लपवून ठेवला होता. तोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा