शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वसई-विरारमध्ये न्यू ईअर पार्टीची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 02:20 IST

न्यू इयर पार्टीसाठी वसई विरार मधील रिसॉर्ट हे पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरते. जितकी रिसॉर्टला मागणी आहे तितकाच बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.

पारोळ/विरार : न्यू इयर पार्टीसाठी वसई विरार मधील रिसॉर्ट हे पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरते. जितकी रिसॉर्टला मागणी आहे तितकाच बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. रिसॉर्ट मालक सर्व सुविधा पुरावण्याकरिता सज्ज झालेले आहेत. पर्यटकांनी फार आधीच आॅन लाईन बुकिंग केल्याने सर्वत्र हाऊसफुलले बोर्ड लागले आहेत.आठवडाभरापासून गर्दी वाढल्याने शहरात चिकन, मटण व मासळीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. १२ नंतर डी. जे वाजवण्यास परवानगी नाही तर अवैध प्रकारे दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी आपला वॉच ठेवला आहे.शनिवार, रविवार सलग आल्यामुळे पार्टीची तयारी जोरात सुरु आहे. ३१ डिसेंबर सोमवारी आल्यामुळे अनेकांनी रविवारी पार्टी करण्यासाठी रिसॉर्टचे बुकिंग करून ठेवले आहे. त्यात पुल पार्टीला सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे. परवाना असणाºया रिसॉर्टमध्येच मद्यपानाची परवानगी असणार आहे. तसेच, बुकिंग घेतान ओळखपत्र तपासण्यात येत असल्याचे वसई रिसॉर्ट संघटनेचे अध्यक्ष महादेव निजाई यांनी लोकमत ला सांगितले.पोलिसांचा देखील या दिवशी कडक बंदोबस्त असणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाºयांवर कारवाई करण्यात येईल. सगळीकडे नाका बंदी लावण्यात येणार आहे व जास्त वेगाने गाड्या चालवणाºयांना देखील पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. डी. जे वाजवण्यावर देखील बंधन असणार आहे.गर्दीच्या ठिकाणी, विशेषत: चर्च परिसरात, तसेच समुद्रकिनारी गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस कर्मचारीही गस्त घालणार आहेत. तसेच, ३१ डिसेंबरच्या दिवशी कुठेही बेकायदा पार्ट्या होऊ नयेत, यासाठी करडी नजर ठेवली जाणार आहे. नियम मोडून नववर्षाचे स्वागत केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिस कर्मचाºयांप्रमाणेच स्वत: प्रभारी अधिकाºयांनीही त्या परिसरात फिरावे, अशा सूचना अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिल्या आहेत. छेडछाडी व सोनसाखळी चोरीच्या घटनांवरही पोलीस लक्ष ठेऊन आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार