शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

वसईमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:57 IST

वाढत्या गुन्हेगारीत पोलिसांची मदार तिसऱ्या डोळ्यावर; सातही पोलीस ठाणी सुसज्ज

नालासोपारा : वसई-विरारमध्ये मागील काही गुन्ह्यांच्या उकलीबाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. याबाबत वसई पोलिसांनी २०१८ साली ‘एक कॅमेरा शहरासाठी’ राबविण्यात आलेली संकल्पना आता खरोखरच पोलिसांना फायदेशीर ठरत आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस प्रशासनाचे मुख्य शस्त्र बनले आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तयार केले आहे. वसईच्या सातही पोलीस ठाण्यांनी आतापर्यंत रस्त्यावर तब्बल एक हजार ४९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पुरेसा फौजफाटा पोलीस ठाण्यात नसल्याने गुन्हेगारी रोखण्यात अपयश आले असले तरी पोलीस कर्मचाऱ्यांची कमी हे सीसीटीव्ही कॅमेरे भरून काढत आहेत.वसई-विरार शहरातील पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीचा ग्राफ बघता २०१८ साली वसईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही मोहीम सुरू केली होती. दरम्यान, लॉकडाऊननंतर गुन्हेगारीचा ग्राफ वाढायला लागला असल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानुसार सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत.मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना तुळींज, विरार, वालीव, माणिकपूर, वसई, अर्नाळा आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राबविण्यात आली आहे. आतापर्यंत वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर, नाक्यावर, गर्दीच्या ठिकाणी आतापर्यंत तब्बल एक हजार ४९ कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी व गुन्ह्यांची उकल होण्यासाठी बऱ्यापैकी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत पोलीस ठाण्यांना मिळणार आहे.    - संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, झोन-२ वसई-विरारमध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यांचे पोलीस ठाण्यातून मॉनिटर ऑपरेट करण्यात येणार आहेत. यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत बरीचशी मदत मिळणार आहे.- प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त, झोन-३, विरार परिमंडळकोणत्या ठिकाणी किती कॅमेरेतुळींज पोलीस ठाणे    १९४विरार पोलीस ठाणे    १११अर्नाळा पोलीस ठाणे    १३८नालासोपारा पोलीस ठाणे    १०५माणिकपूर पोलीस ठाणे     १७४वसई पोलीस ठाणे     १२५वालीव पोलीस ठाणे    २०२