जव्हार : जव्हार तालुक्यातील तिलोंडा गावातील अल्पवयीन नेहा रामल्या भेसकर हिचा खून करणाऱ्या पाटारपाडा येथील दिलेश सोमल्या खरपडे (२१) याला गुरवारी जव्हार पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १४ नोव्हेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. त्याने तिला ३१ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता कुऱ्हाडीचे वार करून ठार करून पळ काढला होता. नेहा ही तिच्या मैत्रिणी सोबत नदीवर कपडे धुण्यासाठी जात असतांना रस्त्यातच तिला अडवून दिलेशने माझ्याशी लग्न कर नाही तर मी तुला ठार मारेन अशी धमकी दिली, मात्र तिने त्यास नकार दिला. त्यामुळे रागवलेल्या दिलेशने तिच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून तिला जागीच ठार करून तो फरारी झाला होता. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला तिलोंडा येथील पाटारपाडा येथे अटक करण्यात आली.
नेहाचा मारेकरी दिलेशला अटक
By admin | Updated: November 15, 2016 04:14 IST