शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच कामगारांची चारित्र्य  पडताळणी करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:11 IST

तारापूरला १७६८ जणांनी घेतले पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट 

पंकज राऊतबोईसर : पालघर जिल्ह्यातील  बोईसर पोलीस ठाणे क्षेत्रात  महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या  तारापूर एमआयडीसी-मध्ये औद्योगिक वसाहत तर तारापूर पोलीस ठाणे क्षेत्रात तारापूर अणु ऊर्जा केंद्र १ व २ आणि ३ व ४ बरोबरच   भाभा अणू संशोधन  केंद्र (बी. ए. आर. सी. ) हे सुरक्षितेच्या दृष्टीने  अत्यंत संवेदनशील असे प्रकल्प  असून या दोन्ही प्रकल्पांमध्ये नव्याने काम करणाऱ्या प्रत्येकाला चारित्र्य पडताळणीचा दाखला (पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट) पोलिसांकडून घ्यावे लागत असून या वर्षी  एकूण १७६८ जणांनी ते घेतले आहे.   काही वर्षांपूर्वी बीएआरसीतील बांधकामासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या काँन्ट्रॅक्टरनी  त्यांच्या  कामगारांसाठी पी.सी.एस. मिळविण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञापत्रात राहण्याचा पत्ता चक्क तारापूर बीएआरसी साईटचा दिला होता. वास्तविक पाहता  ज्या प्रकल्पात  कामाकरिता प्रवेश मिळायला हवा. त्याकरिता पी.सी.एस.ची  गरज आहे.  मग अगोदरच तेथे वास्तव्य कसे?  हे सर्व चक्रावून टाकण्यासारखे होते.या सर्व बाबी लक्षात घेता कामगारांची चारित्र्य पडताळणी होणे अत्यंत आवश्यक आहे.

मूळ गावातून माहिती मिळवणे आवश्यक     सुरक्षिततेच्या दृष्टीने  संवेदनशील  बीएआरसी आणि तारापूर अणुऊर्जा केन्द्रसारख्या  महत्त्वाच्या प्रकल्पात काम करण्यापूर्वी  विविध राज्यातील संबंधित कामगारांना त्यांच्या मूळ गावातील पोलीस स्थानकातून  गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भातील माहिती मागवून नंतरच प्रमाणपत्र दिले जाणे गरजेचे आहे. 

तारापूरमध्ये १७६८ कामगारांची पडताळणी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प व भाभा अणु संशोधन केंद्र या दोन अतिशय संवेदनशील केंद्रात नव्याने काम करणाऱ्या प्रत्येकाला पोलीस  क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावे लागते. त्यामुळे जानेवारी २०२० पासून आतापर्यंत एकूण १७६८ जणांनी सर्टिफिकेट घेतले असून १२७ जणांचे अर्ज पेंडिंग आहेत.गृह विभागाच्या पोलीस क्लिअरन्स सर्विसेस या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.  अर्ज आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत की नाही त्याची तपासणी करून  अहवाल पाठवला जातो. - संताेष जाधव,  सहाय्यक पोलीस निरीक्षक, तारापूर पोलीस ठाणे.

संवेदनशील अशा तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच  तारापूर औद्योगिक क्षेत्रात काम  करण्यापूर्वी त्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती तर नाहीत ना याकरिता खबरदारी म्हणून चारित्र्य पडताळणी होणे गरजेचे आहे.  - डी. के. राऊत, अध्यक्ष, तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर, असोसिएशन

पडताळणीसाठी असा करा अर्जमहाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या पोलीस क्लिअरन्स सर्विसेस या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरताना फोटो व सही अपलोड करून कशाकरता सर्टिफिकेट पाहिजे ते नमूद करावे लागते. 

टॅग्स :Policeपोलिस