शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नवरात्रोत्सवावर स्वदेशीचे वर्चस्व, दिव्यांच्या माळांपासून, तोरणे, कृत्रिम फुले, पाने स्वदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:35 IST

अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे़ देवीचा आरास, दिप माळा, डेकोरेशन साहित्य, साज आदिंची खरेदीसाठी बाजारात आतापासूनच गर्दी दिसत आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे मार्केटचा कल यंदा बदलला असून चीन विरोध वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

राहुल वाडेकर ।विक्रमगड : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे़ देवीचा आरास, दिप माळा, डेकोरेशन साहित्य, साज आदिंची खरेदीसाठी बाजारात आतापासूनच गर्दी दिसत आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे मार्केटचा कल यंदा बदलला असून चीन विरोध वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. ग्राहक दुकानदाराकडे वस्तूंची मागणी करतांना मेड इन इंडिया आहे का? असा खणखणीत प्रश्न विचारत असल्याने व्यापा-यांनीही होलसेल मार्केटमध्ये तशी मागणी करुन स्वदेशीला पसंती दिली आहे.आनंद व उत्साहाचा हा सण असल्याने आंबेमातेच्या स्वागतासाठी त्याच्या आसनाच्या व्यवस्थेसाठी सुंदर आरास सुंदर डेकोरशन करावे आणि माता विराजमान होण्यापूर्वी ते पूर्ण व्हावे, यासाठी अधिक लक्ष दिले जाते़. त्यादुष्टीने बाजारपेठाही सजतात. मात्र दिवसेंदिवस बाजारपेठांवर चायनामेड वस्तूनी आक्रमण केल्याचेच दिसत आहे़ चायनामेड वस्तू दिसायला अतिशय सुंदर व कमी किंमतीच्या असल्याने त्याच्या खरेदीकडे ग्राहक अधिक आकर्षित होतांना दिसत होते मात्र अलिकडे चायनामेड वस्तू खरेदीवर भारतीयांनी जवळ जवळ बहिष्कारच टाकलेला दिसत आहे़ महाग का होईना परंतु स्वदेशी वस्तुंचीच सणांना खरेदी करण्याचा निर्धार एकुणच बाजारपेठेतील सुर पाहून कळतो. नवरात्रीसाठी विक्रमगड तालुक्याची प्रसिध्द बाजारपेठ चायनामेड व स्वदेशी वस्तुंनी भरली असून त्यातही नवनवीन प्रकार आलेले आहेत़ त्याशिवाय तोरणे, माळा, कृत्रिम फुले, पाने, दिव्यांच्या माळांच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा अक्षरश: नव्या नवरीसारख्या सजल्या आहेत़ग्राहकांची कृत्रिम फुलांना मोठी मागणी असून ५० रुपयांपासून ७०० रुपये किमतीपर्यत फुले उपलब्ध आहेत़ फुलांमध्ये जाई, जुईच्या फुलाला सर्वात जास्त मागणी आहे जाई-जुईच्या फुलांचा समुह १०० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यतच्या दरामध्ये उपलब्ध आहे. आंबेमातेच्या आसपास कृत्रिम हिरवळ पसरुन नैसर्गीक लूक देण्याकडेही भक्तांचा कल वाढू लागला आहे़ त्यामुळे हिरवळलीही चांगली मागणी आहे.  त्याशिवाय टॉमेटो, सफरचंद अशा फळांची छोटी मोठी शोभिवंत झाडेही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. रंगीबेरंगी दगड, कृत्रीम धबधबे असे अनेक पर्याय पहावयास मिळत आहेत. या सगळया सजावटीच्या वस्तुुंबरोबर रोशणाईही हवी ना़ त्यासाठी मग विविध रंगाच्या, आकाराच्या माळांनी तुम्हांला न खुलावले तर नवलच़ माळांशिवाय स्वस्तीक, ओम, फुलपाखरेही सजावटीकरीता उपलब्ध आहेत़ भारतीय बनावटींच्या दिव्यांचा माळा २५० ते ३०० रुपयांपासुन आहेत. तर चायनीस बनावटीच्या माळेची किंमत १०० रुपयापासुन पुढे आहे.>दर्जाबाबत भारतीय वस्तूच सरसभारतीय वस्तु बाजारात उपलब्ध असल्या तरी चायना मेड वस्तुंचा मोठा पगडा नागरिकांवर यापुर्वी दिसुन येत होता. चायनीज वस्तु दिसायला सुंदर, मनमोहक व आकर्षक असल्यास तरी त्यांमध्ये टिकाऊपणा नसतो. त्या तकलादू असल्याने वापरा आणि फेका या प्रकारातील असतात.मात्र भारतीय वस्तु हया टिकायला मजबुत व एकदा खरेदी केलेली वस्तु दोन तिन वर्ष हमखास चालते. हे आता ग्राहकांच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे तरी थोडे महाग असले तरी चायनामेड नको अशी परिस्थिती दिसत आहे़>सजावट साहित्याचा दरकृत्रिम फुले ५० ते ७०० रुपयेझाडे २०० आणि पुढेरोषणाई माळाभारतीय १५० आणि पुढेचायनामेड १०० आणि पुढेदिव्यांच्या माळा १०० आणि पुढेसुर्यफुलांचे दिवे २५० (जोडी)