शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भूमिपुत्रांसाठी आगरीसेनेचा रास्ता रोको, राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 02:36 IST

भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.

वसई  - भूमीपूत्रांच्या न्यायहक्कासाठी ‘अभी नही तो कभी नहीं’ चा नारा देत आगरी सेना भूमिपूत्रांसोबत शुक्र वारी राष्ट्रीय महामार्गावर धडकली. हजारो भूमिपूत्र या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील विविध पक्षांनी या महामार्ग रास्ता रोकोला जाहिर पाठींबा दर्शवला होता.पालघरचा विकास हा भूमीपुत्रांच्या जागेवरच झाला आहे. मात्र, स्थानिक भूमिपूत्र नेहमीच दुर्लक्षीत राहिले. त्यांच्या विविध मागण्या पूर्ण होत नसल्याने आगरी सेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर शुक्र वारी सकाळी ११ वाजता शिरसाड, विरार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाचा सुरु असलेला भोंगळ कारभार, वाढीव घरपट्टी, मच्छीमार बांधवांचे ओएनजीसीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई, वीज समस्या, पाणी समस्या, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, उद्योग व्यवसाय, रु ग्णालय, महाविद्यालय, नारंगी उड्डाणपूल, बांधकामावर पालिकेचे दुर्लक्ष अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलकांनी मुंबई-अहमदाबाद महामार्ग अर्धा तास रोखून धरला होता. यामुळे महामार्गावर लांबचलांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.येथे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी वसईचे प्रांताधिकारी डॉ. दीपक क्षीरसागर, तहसीलदार किरण सुरवसे यांनी आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्विकारले. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पालघर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक बोलावून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितल्या. त्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, मागण्या पुर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असे आगरीसेनेचे कैलास पाटील यांनी संगीतले.आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.विविध पक्षांचाही पाठींबा : आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसह हजारोच्या संख्येने वसई, विरार, पालघर परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी आगरी सेना जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, कैलास पाटील, ‘मी वसईकर’चे मिलिंद खानोलकर, शिवसेनेचे दिलिप पिंपळे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशा आहेत मागण्यापालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या सरकारी विविध प्रकल्पात भूमिपूत्रांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकºयांमध्ये आरक्षण, ओ.एन.जी.सी.च्या सागरी सर्वेक्षणामूळे दोन महिने मच्छीमारी बंद करण्यात आली आहे, त्याचा मोठा फटका मच्छीमार बांधवांना बसतो आहे. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी.वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताकरांमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. वाढीव घरपट्टीमूळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे त्यामूळे तीमध्ये वाढ करण्यात येऊ नये, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई बडोदरा महामार्ग, विरार अलिबाग कॉरिडोअर या प्रकल्पात बाधित शेतकºयांना योग्य मोबदला न मिळाल्यास विरोध केला जाणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार