शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

‘नामपाडा’ अडकला लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 11:56 PM

पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे.

वसंत पानसरे किन्हवली : किन्हवली विभागातील पाच महसुली गावे व १३ आदिवासीपाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला शहापूर तालुक्यातील नामपाडा (कुतरकुंड) लघुपाटबंधारे प्रकल्प २०१२ पासून लालफितीत अडकला आहे. निविदा, मुदतवाढ यांची कालमर्यादा संपुष्टात आल्याने हजारो शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. किंबहुना, प्रत्यक्ष प्रकल्पावर १३ कोटी व पर्यायी वनीकरणासाठी एक कोटींचा चुराडा करूनही या प्रकल्पाचे भविष्य अधांतरीच असल्याचे वास्तव समोर आले आहे.टाकीपठार परिसरातील सावरोली ग्रुपग्रामपंचायत क्षेत्रात हिवाळा या जंगलपट्ट्यात कुतरकुंड या डोहावर आघाडी सरकारच्या काळात २००५-०६ मध्ये नामपाडा लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला होता. त्यावेळी मुख्य धरणाचे मातीचे बांधकाम, सांडवा विमोचक बांधकाम व इतर कामांसाठी सहा कोटी ५१ लाख ८०२ रु पये मंजूर केले होते. या बंधाºयासाठी वनविभागाची ३८.९८ हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक होते. या प्रकल्पास १३ मे २००८ रोजी केंद्राच्या वनविभागाने तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर २००९ मध्ये कामाला सुरु वात झाली. दरम्यान, वनाची अंतिम मंजुरी घेण्यासाठी वैष्णवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीने तत्परता न दाखवल्याने ३५ टक्के काम झाल्यानंतर २०१२ मध्ये वनविभागाने हरकत घेत या प्रकल्पाचे काम थांबवले. दरम्यान, मागील आठ वर्षांत ठेकेदाराने रीतसर प्रक्रि या पूर्ण करून प्रकल्प सुरू करण्यासाठी दुर्लक्ष केल्याने २०१६ मध्ये या प्रकल्पाच्या कामाची निविदा व मुदतवाढ संपुष्टात आली.नामपाडा प्रकल्पासाठी लागणाºया वनजमिनीच्या बदल्यात विविध भागांतील जमिनी वर्ग करण्यात आल्या. पाच कोटी मोबदलाही देण्यात आला होता. परंतु, २००८ पासून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर न केल्याने मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने त्रुटींची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते.वनविभागाने लघुपाटबंधारे विभागाला पर्यायी वनीकरणासाठी २०१८ मध्ये ७७ लाख ८८ हजार १८८ रु पये अधिकची रक्कम भरण्याचे आदेश देत मार्च २०१९ पर्यंत त्रुटींची पूर्तता करण्यास मुभा दिली होती. मात्र, त्यानंतरही त्रुटींची पूर्तता न केल्याने २०१९ मध्ये २१ लाख २२ हजार व २०२० मध्ये पुन्हा २४ लाख रु पये भरण्याचे आदेश दिले.या प्रकल्पावर आतापर्यंत १३ कोटी चार लाख खर्च झाले असून केंद्रीय वनविभागाची मान्यता न घेतल्याने नामपाडा प्रकल्प ठप्प झाला आहे. दरम्यान, ठेकेदारास काळ्या यादीत टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.।या गावांमध्ये पाणीटंचाईप्रकल्पाअभावी सावरोली, कानडी, नांदगाव, खरिवली, आपटे या महसुली गावांसह बेलकडी, गांगणवाडी, वडाचीवाडी, हिरव्याचीवाडी, नामपाडा, टाकीचीवाडी, मधलीवाडी, रिकामवाडी, उंबरवाडी, डोंगरी, कातकरीवाडी या आदिवासीपाड्यांत टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.