शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा शहर मादक पदार्थ आणि गांजाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 02:38 IST

नालासोपारा शहरात तीन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहे. तसेच शहरात मादक पदार्थ आणि गांजाची खुलेआम विक्री केली जात असल्याने तरुण पिढीला व्यसनाधिन करणाºया या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे.

वसई : नालासोपारा शहरात तीन ठिकाणी हुक्का पार्लर सुरु आहे. तसेच शहरात मादक पदार्थ आणि गांजाची खुलेआम विक्री केली जात असल्याने तरुण पिढीला व्यसनाधिन करणाºया या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांनी केली आहे.नालासोपारा पूर्वकडील सनशाईन मॉल, गॅलेक्सी हॉटेल आणि ब्रॉड वे मॉलमधील निलम पंजाब हॉटेलमध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरु आहे. निलम पंजाब मधील हुक्का पार्लरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाणही करण्यात आली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी याठिकाणी आगही लागली होती. त्यामुळे या हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.नालासोपारा शहरात गेल्या सहा महिन्यात मादक पदार्थ आणि गांजा विकणाºया अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. हनुमान नगरात ड्रग्जची तस्करी करणाºया आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली होती. तर चार महिन्यात गांजा विकणाºया चार महिलांनाही अटक करण्यात आली होती. शहरात नायजेरियन आणि बांगलादेशीय नागरीकांची बेकायदा वस्ती आहे. यातील बरीचशी माणसे ड्रग्जच्या धंद्यात गुंतलेली आहेत. त्यामुळे नालासोपारा शहरात मादक पदार्थ आणि गांजाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.हुक्का पार्लरच्या माध्यमातून, पान टपºयांवर सध्या मादक द्रव्य आणि गांजा विकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हुक्का पार्लरकडे आकर्षित होऊन तरुणी पिढीला मादक पदार्थ, चरस गांजा, ब्राऊन शुगर आदी मादक द्रव्यांचे सेवन करण्याचे व्यसन लागले आहे. त्यामुळे येथील हुक्का पार्लर बंद करून तरुण पिढीचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवावे, अशी मागणी पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार