शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

नगर-कल्याण फक्त ३ तासांत, अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वेचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:52 IST

पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले

राजुरी : पुणे-ठाणे, पालघर, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणाऱ्या व पंचवीस वर्षांपासून रखडलेल्या अहमदनगर-माळशेजमार्गे कल्याण रेल्वे मार्गाचे प्राथमिक तांत्रिक सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले असून एकूण २६ रेल्वेस्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मार्गावर रेल्वे सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये; तसेच शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे व हा मार्ग सुरू झाल्यास नगर ते कल्याण अंतर अवघ्या तीन तासांत पार करता येणार आहे.गेल्या पंचवीस वर्षांपासून रखडलेला अहमदनगर - कल्याण रेल्वे मार्गाला नुकतीच परवानगी मिळाली असून नगर व पुणे जिल्ह्यातील शेतमाल मुंबई येथे अत्यंत कमी वेळेत पोहोचवू शकणाºया या रेल्वे मार्गाची अनेक वर्षांपासून मागणी होती. तो व्हावा, यासाठी माळशेज रेल्वे कृती समितीने मोठा संघर्ष केलेला आहे. हा मार्ग अहमदनगर येथे सुरू होणार असून नगर, भाळवणी, धोत्रे, वासुंदे, शिंदेवाडी, काटाळवाडी, माळवाडी, पादरवाडी, ओतूर, जुन्नर रोड, मढ, केबिन, देवरूखवाडी, नागतार सफरकेबीन, डाहरी मिल्वे, मुरबाड, पाटगाव, आपटी कांबा रोड, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी व कल्याण असा मार्ग असणार असून ही वरील गावांची नावे रेल्वे स्थानक म्हणून प्रस्तावित करण्यात आली आहेत.रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करणाºयांनी हा रेल्वे मार्ग पूर्णपणे फायद्यात असेल असा निर्वाळा दिला आहे. सध्या या तांत्रिक सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर रेल्वे बोर्डासमोर ठेवण्यात येणार आहे. मार्गाला मान्यता मिळण्याची फक्त औपचारिकता बाकी असल्याने हा मार्ग मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे पाहता हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर याचा फायदा विशेषकरून ग्रामीण भागातील शेतकºयांना तसेच मुंबई या ठिकाणी कामासाठी असलेल्या कामगारांना होणार आहे. कारण शेतकरीवर्ग आपला शेतीमाल दररोज मुंबईला विकण्यासाठी नेऊ शकतो, कारण शेतीमाल मुंबईला एसटीने घेऊन जायचा असेल तर सहा ते सात तास लागतात व यासाठी खर्चही खूप येतो हाच माल रेल्वेने नेला तर अवघ्या दीड ते दोन तासात पोहोचत असून खर्चही खूप कमी येणार आहे, तसेच मुंबईला नोकरीसाठी असलेले ग्रामीण भागातील जे लोक आहेत, ते दररोज जाऊन येऊन ती करू शकतील व त्यांच्या खर्चातदेखील बचत होणार आहे. तसेच या मार्गावर असणारा माळशेज घाट सध्या पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण असून रेल्वेच्या सोयीमुळे तेथील पर्यटन व्यवसाय अधिक फुलणार आहे व जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी तालुका पर्यटन तालुका व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती व त्यात त्यांना यशदेखील आले आहे व तालुका पर्यटन क्षेत्रात मोडला आहे. तसेच या विभागाचे खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले, की हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर कसा होईल, यासाठी सतत पाठपुरावा केलेला आहे तसेच लवकरच मान्यतेसाठी प्रयत्न चालू आहे. यामुळे आता त्याच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते? याकडे चारही जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.>शेतकºयांना मिळणार मोठी बाजारपेठहा माळशेज रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर ठाणे पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांसाठी असलेल्या बाजारपेठ जवळ येणार आहेत.तसेच अहमदनगरमार्गे पुढे औरंगाबादमार्गे विशाखापट्टणम हा मार्गदेखील जवळ येणार आहे. त्यामुळे हा मार्ग या चारही जिल्ह्यांतील शेतकºयांसाठी विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असून महत्त्वाचा ठरेल.