शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘माझा कार्यकर्ताच आता आमदार होणार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 00:17 IST

कित्येक वर्षांपासून लागलेला अविकासाचा कलंक पुसण्यासाठी आता अंग झटकून कामाला लागा.

जव्हार : कित्येक वर्षांपासून लागलेला अविकासाचा कलंक पुसण्यासाठी आता अंग झटकून कामाला लागा. ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची असून सत्तेतल्या शहाण्यांना आता खाली खेचणे गरजेचे आहे. यामुळे अभी नहीं तो कभी नही, असा लढा आपल्याला द्यावा लागणार आहे. माझा प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार असणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी विक्रमगड विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकीत केले.कित्येक वर्षापासून भाजपाचा आमदार नंतर मंत्रीही झाले. मात्र येथील आदिवासी बांधव आजही मूलभूत गरजांसाठी झटत आहे. ही निवडणूक जिंकली तर पुढील सर्व निवडणुका आपण जिंकणार असल्याने विधानसभा जिंकून पुढील सर्व निवडणुकांची बीजे आपल्याला रोवायची आहेत. आपण आजवर आमदार या लाभाच्या पदापासून लांब राहिल्याने आपला विकास खुंटला. मात्र आता आपले हे दुर्दैव पुसण्यासाठी आपण तन मनाने काम करायला हवे. लोकसभेत चांगले काम करून ‘हम किसीसे कम नही’, हे दाखवून दिले. त्याच पद्धतीचे काम आगामी दिवसांत करण्याचे आवाहन यावेळी भुसारा यांनी केले. आज आम्ही जे काही आहोत आणि जे काही करायचेय यासाठी आमची सर्व भिस्त कार्यकर्त्यांवर असल्याचेही ते म्हणाले.यावेळी विक्रमगड विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोठेकर, जिल्हा सरचिटणीस अशोक चौधरी, विक्र मगड तालुकाध्यक्ष शिवा सांबरे, वाडा तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, जव्हार तालुकाध्यक्ष कमळाकर धुम, मोखाडा तालुकाध्यक्ष अशोक मोकाशी आदी उपस्थित होते.>राष्ट्रवादीचाच आमदार हवाराष्ट्रवादीचा आमदार पाहिजे, अशीच येथील जनसामान्यांची भावना आहे. येथील विकासासाठी बदल हवाच. यामुळे या निवडणुकीत आम्ही आपल्या पाठीशी असल्याचे मत या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. येत्या २५ दिवसांत जे मला वेळ देतील त्यांच्यासाठी माझा येणारा प्रत्येक क्षण असेल असे वचन भुसारा यांनी यावेळी दिले.