शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:19 IST

विरार : शहरातील पश्चिमेला असणाऱ्या एम.बी स्टेटमध्ये राहणाºया योगेश राऊत (३५) याच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या घडविल्याचा प्रकार गुरु वार रात्री घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून आणखी एक जण फरार आहे.एम.बी. स्टेट या परिसरात गीता अपार्टमेंट मध्ये पत्नी अश्विनी राऊत हिच्या सोबत तो वास्तव्यास ...

विरार : शहरातील पश्चिमेला असणाऱ्या एम.बी स्टेटमध्ये राहणाºया योगेश राऊत (३५) याच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या घडविल्याचा प्रकार गुरु वार रात्री घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून आणखी एक जण फरार आहे.एम.बी. स्टेट या परिसरात गीता अपार्टमेंट मध्ये पत्नी अश्विनी राऊत हिच्या सोबत तो वास्तव्यास होता. पत्नीचे प्रेम संबध समजल्यावर त्यांच्यात रोज भांडण होऊ लागली. त्याचा राग मनात धरुन तिने आपल्या प्रियकराला हाताशी धरून नवºयाची सुपारी दिली.अर्नाळा पोलीस रात्री गस्तीवर असताना त्यांना एका दुचाकी वरून मोठे गाठोडे नेताना दोन इसम दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने व त्या गाठोड्यामध्ये चोरीचा मुद्देमाल असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग केला. पोलीस मागावर असल्याने गडबडीमध्ये त्यांची दुचाकी एका ठिकाणी चिखलात अडकली त्यामुळे त्यांच्या जवळते गाठोडे खाली पडले तेव्हा दुचाकीवरील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी गाठोडे उघडून पहिले तर त्यांना योगेशचे हात-पाय व गळ्याला ओडणीने बांधलेला मृतदेह सापडला असे पोलीस उपअधीक्षक जयवंत बजवले यांनी लोकमतला सांगितले.पोलिसांनी पत्नी अश्विनीकडे चौकशी केली असता आधी तिने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र नंतर ती बोलती झाली. आरोपींवर कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एका आरोपीचा पोलीस तपास करत आहेत. पती झोपलेला असताना त्याला मारून टाकले व दीड लाखाला पतीची सुपारी दिली असल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे.

टॅग्स :MurderखूनArrestअटक