शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाला धोरणाबाबत महापालिका उदासीन, वसई-विरार शहरांत ४० हजारांहून अधिक फेरीवाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 01:57 IST

Vasai-Virar News : वसई-विरार महापालिका फेरीवाला धोरणासंदर्भात उदासीन असून शहरातील फेरीवाल्यांची संख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. तर पालिकेच्या दफ्तरी ही नोंद केवळ १५ हजार इतकी आहे.

- प्रतीक ठाकूरविरार : वसई-विरार महापालिका फेरीवाला धोरणासंदर्भात उदासीन असून शहरातील फेरीवाल्यांची संख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. तर पालिकेच्या दफ्तरी ही नोंद केवळ १५ हजार इतकी आहे. ११ सप्टेंबर २०१९ रोजी महासभेने फेरीवाला धोरणाचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यावर पूर्ण विचार करून नव्याने हे धोरण आखणे अपेक्षित होते; परंतु दोन वर्षांचा काळ लोटला तरी हे धोरण अंमलात आलेले नाही.पालिकेच्या धोरणानुसार विक्रीसाठी नागरी नियोजन, शहरातील फेरीवाल्यांचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून त्यानुसार नोंदणी करणे, ओळखपत्र देणे, डाटाबेस तयार करून खरेदी-विक्रीसाठी फेरीवाल्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे; फेरीवाल्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना बँकिंग सेवा तसेच क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देणे, फेरीवाल्यांसाठी बाजारपेठांचा विकास करून देणे, सामाजिक सुरक्षिततेची एक केंद्राभिमुखता याद्वारे फेरीवाल्यांना केंद्र व राज्य शासनाकडील सुरक्षितता लाभ व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, पालिका क्षेत्रात प्रभागनिहाय फेरीवाला झोन तयार करणे अशी कामे पालिका करणार होती. पण अजूनही यासंदर्भात कोणतीही हालचाल झालेली नाही.वसई-विरार शहर महापालिकेने फेरीवाल्यांची २०१६ मध्ये बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदणी केली आहे. यात केवळ स्थिर १२,७६८ व अस्थिर २,३८८ फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात  आली आहे. दरम्यान, मागील पाच वर्षांत फेरीवाल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकांनी उपजीविकेसाठी रस्त्यावर छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांची संख्या वाढली असल्याचे बोलले जात आहे. पालिकेने २०१६ रोजी फेरीवाल्यांची नोंदणी केली होती. त्यानंतर नोंदणी झाली नाही. यासंदर्भात पालिका नव्याने सर्वेक्षण करून फेरीवाला धोरणात सुधारणा करणार आहे. पालिकेने काही फेरीवाला झोन तयार केले आहेत. लवकरच या ठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरित केले जाईल.- धनश्री शिंदे, उपायुक्त,  वसई-विरार महानगरपालिका रस्त्यावर फेरीवाल्यांचे साम्राज्य वाढत आहे. शहरातील रस्ते हे नागरिकांच्या सोयीसाठी नसून फेरीवाल्यांच्या सोयीसाठी असल्याचे दिसत आहे.- महेश कदम, मनसे विरार शहर सहसचिव

टॅग्स :hawkersफेरीवालेVasai Virarवसई विरार