शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पालिका आयुक्तांचा जाता जाता ‘दे धक्का’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 01:38 IST

आयुक्त बी.जी. पवार यांनी जाता जाता आपल्या आस्थापना विभागाला आदेश देत कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना ‘दे धक्का’ दिला असल्याची बाब समोर आली आहे.

वसई : वसई-विरार शहर महापालिकेच्या ऐच्छिक स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या आयुक्त बी. जी. पवार यांनी जाता जाता आपल्या आस्थापना विभागाला आदेश देत कर्मचारी-अधिकारी वर्गाच्या अंतर्गत बदल्या करून सर्वांना ‘दे धक्का’ दिला असल्याची बाब समोर आली आहे.पालिकेचे आयुक्त बळीराम पवार ३१ डिसेंबरला स्वेच्छानिवृत्त झाले असून आता महापालिकेचा कारभार जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, पवारांनी जाता-जाता अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करून आपला दणका दिला आहे. यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी परिस्थिती सध्या विविध प्रभागात चर्चिली जात आहे. गंभीर बाब म्हणजे पालिकेतील अनेक सहाय्यक आयुक्तांना पदावरून पायउतार करण्यात आले आहे, तर काहींना मानाच्या खुर्चीवर बढती देण्यात आली आहे. यामध्ये १० अधिकाऱ्यांचा समावेश असून यात मेधा वर्तक, प्रेमसिंह जाधव, राजेश घरत, मिलिंद पाटील, वसंत मुकणे, अंबादास सरवदे, दीपाली ठाकूर, विकास पाडवी, प्रशांत चौधरी आणि सुरेंद्र पाटील यांना बढती देण्यात आली आहे.वरिष्ठ लिपिक मेधा वर्तक या प्रभाग समिती आयच्या प्रभारी लेखापाल होत्या. आता त्यांना या समितीच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त करण्यात आले आहे. उपअधीक्षक असलेले प्रेमसिंह जाधव अभिलेख कक्षाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त होते. त्यांना निवडणूक व जनगणना तसेच स्थायी समिती सभापती यांचे स्वीय सहाय्यक व प्रभारी सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरे उपअधीक्षक राजेश घरत यांना धानिव-पेल्हार समितीचे सहाय्यक आयुक्तपद देण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ निरीक्षक वसंत मुकणे यांना प्रभाग समिती ‘सी’चे सहाय्यक आयुक्त करण्यात आले आहे. तर वरिष्ठ लिपिक असलेले अंबादास सरवदे हे प्रभाग ‘सी’चे सहाय्यक आयुक्त होते. त्यांची नालासोपारा प्रभाग ‘ई’मध्ये उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रभाग ‘एफ’च्या सहाय्यक आयुक्त दीपाली ठाकूर यांची ‘एच’ प्रभागात महिला आणि बालकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे.>लिपिक-सहाय्यक आयुक्तलिपिक विकास पाडवी यांच्याकडे सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी होती. ती काढून त्यांना अतिक्रमण विभागात पाठवले आहे.लिपिक प्रशांत चौधरी वालीवचे सहाय्यक आयुक्त होते. त्यांना आता मुख्यालयातील लेखा विभागात पाठवण्यात आले आहे.