शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
4
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
5
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
7
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
8
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
9
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
10
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
11
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
12
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
13
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
14
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
15
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
16
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
17
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
18
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
19
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
20
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले

मुंबईच्या महिला क्रिकेट संघात वसई-विरारच्या लेकींचा बोलबाला, सिनियर संघात तीन मुलींची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 11:35 IST

Mumbai's women's cricket team: मुंबईच्या सिनियर महिलांच्या क्रिकेट संघात वसई- विरारच्या अजुन तीन मुलिंची निवड झाल्याची माहिती प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमत ला दिली आहे.

- आशिष राणेवसई - मागील महिन्यातच  मुंबईच्या १९ वर्षाखालील  मुलींच्या क्रिकेट संघात विरार नंदखाल गावांतील झील डिमेलो आणि वसई पूर्वेची बतूल परेरा या दोन्ही मुलींचीची निवड झाली होती. त्यानंतर पुन्हा आता मुंबईच्या सिनियर महिलांच्या क्रिकेट संघात वसई- विरारच्या अजुन तीन मुलिंची निवड झाल्याची माहिती प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी लोकमत ला दिली आहे.

जान्हवी काटे, रिया चौधरी, जाग्रवी पवार यांची मुंबईच्या सीनियर महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाल्यानं सर्वत्र या मुलींचे कौतूक होत आहे. या संदर्भात पिंगुळ कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे हा मुंबईचा महिला संघ बी सी सी आय मार्फत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील साखळी स्पर्धेत सहभागी होणार असून या क्रिकेट  स्पर्धा येत्या दि.३१ ओक्टोबर पासून पुणे येथे होणार आहेत.

दरम्यान या तीन मुलींच्या क्रिकेट विषयी सांगायचे झाले तर या तिघि मागील ५ वर्षा पासून विरार स्थित अमेया स्पोर्ट्स अकादेमी  मार्फत  चालणाऱ्या गोल्डन स्टार क्रिकेट अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांच्याकडून खडतर प्रशिक्षण घेत आहेत. तर मागील वर्षीही याच तिघिंची याच गटात निवड झाली होती. या मुलींची क्रीडा कामगिरी म्हणजे १९ वर्षाची जान्हवी काटे ही उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करते,व उजव्या हातानेनच फटकेबाज फलंदाजी देखील करते. तर २० वर्षाची रिया चौधरी ही यष्टिरक्षक असून ती देखील  सुंदर फलंदाजी करते,सोबत  २० वर्षाची जाग्रवी पवार ही सुधा उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी करून ती फलंदाजी सुध्दा करते.

तिन्ही मुली मैदान गाजवणार ; सर्वत्र कौतुकपैकी जान्हवी काटे हिची मागच्या वर्षी २३ वर्षा खालील  महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत चांगले कौशल्या दाखवल्यानं बी सी सी आय  मार्फत होणाऱ्या चैलेंजर स्पर्धेत तिची इंडिया रेड संघात निवड झाली होती.तर रिया चौधरी हिची नॅशनल क्रिकेट एकेडमी तर्फे १९ वर्षा खालील मुलीच्या  बेंगलोर येथील प्रशिक्षण शिबिरा साठी निवड झाली होती. त्यामुळे या तिन्ही मुली मैदान गाजवणार यात शंकाच नाही.

विरारच्या यशवंत नगर येथे वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या उत्तम सहकार्यामुळेच अशा  मुलीसाठी  चालणाऱ्या मोफत प्रशिक्षण शिबिरातून खरोखर चांगले व होतकरू  खेळाडू घडत आहेत आणि मागील महिन्यात निवड झालेल्या दोघी व आज पुन्हा तीन  खेळाडू याउलट स्वतः प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांचे देखील समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे  हे विशेष आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईVasai Virarवसई विरार