शहरं
Join us  
Trending Stories
1
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
2
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
3
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
4
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
5
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
6
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
7
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 
8
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
9
चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल
10
लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
11
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
12
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
13
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
14
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
15
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
16
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
17
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
18
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
19
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
20
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक

मुंबई-नाशिकच्या पर्यटकांचा मोर्चा पालघरकडे, सलग तीन दिवसांची सुट्टी अन् ख्रिसमस साजरा करण्याचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:24 IST

Palghar : कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे.

पालघर : मुंबईमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान असलेल्या संचारबंदीमुळे मजा करण्यास मुकणार असल्याने ख्रिसमसमुळे सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांची मजा लुटण्यासाठी मुंबई, नाशिक आदी भागांतून शेकडो पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील  केळवे, बोर्डी, दातीवरे आदी भागांत पर्यटकांची मोठी संख्या दिसून येत आहे. कोरोनाचा उद्रेक आता हळूहळू बऱ्यापैकी ओसरत असल्याने सरकारने पर्यटनावर लादलेली अनेक बंधने हटवली आहेत, तसेच करमणुकीच्या साधनांना परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वॉटर स्पोर्ट, नौकानयन आणि मनोरंजन पार्क उघडले गेले आहेत. २५ डिसेंबर ख्रिसमस आणि सलग आलेल्या शनिवार, रविवार अशा तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कोरोनाकाळात घरात अडकून पडलेली अनेक कुटुंबे जिल्ह्यातील ११० किमीच्या किनाऱ्यावर उभारलेल्या पर्यंटनस्थळांवरील रिसॉर्ट, हॉटेल्समध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे पालघरच्या केळवे, डहाणू, नरपड, बोर्डी, उसरणी, कोरेसर, वसई तालुक्यातील कळंब, राजोडी, अर्नाळा आदी भागांत पर्यटकांनी किनारे फुलून गेले आहेत.हॉटेल रेस्टॉरंट, लॉजिंग पर्यटकांनी व्यापले आहेत. दरम्यान, गर्दी होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने नाताळ सण आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे, मात्र पालघर जिल्ह्यामध्ये असा कुठलाही मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जारी केला नाही. त्यामुळे हॉटेल मालक, रिसॉर्ट मालक यांनी समाधान व्यक्त केले असून  मागील १० महिन्यांपासून मरगळ आलेल्या या व्यवसायाला पुनरुज्जीवित करण्यासाठी ख्रिसमससह आलेल्या सलग तीन दिवस सुट्ट्यांची संधी साधण्यासाठी हॉटेल मालक सज्ज झाले आहेत.

कडक पोलीस बंदोबस्तकेळवे सागरी पोलिसांनी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीला रोखण्यासाठी बीचवर पोलीस बंदोबस्त वाढविला असून सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट मालकांना डीजेबंदी, मद्यपानासह वेळेचे बंधन पाळण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सागरी पोलीस ठाण्याचे सपोनि बी.जी. गायकवाड यांनी ‘लोकमत’ला दिली. मुंबई, नाशिक आदी भागांतून येणारी गर्दी, केळवे पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हॉटेल्समध्ये रेव्ह पार्टी, मादक द्रव्यांचा वापर होऊ नये यासाठी पोलीस सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर