वसई : वरसावे पुलाची दुरु स्ती लवकर करून वाहतुक सुरळीत करण्यात यावी या मागणीसाठी वसई शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.पुलाला तडे गेल्याने मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जुना वरसोवा पूल दुरु स्तीसाठी अवजड वाहनांना बंद करण्यात आला आहे. जुन्या पुलावरून फक्त हलकी वाहने सोडली जातात. त्यासाठी एक तर्फी वाहतुक व्यवस्था करण्यात आली असून दोन्ही पूल किमान वीस मिनिटे बंद ठेवले जातात. त्यामुळे चार चार किलोमीटरच्या रांगा लागून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.यावर आवाज उठवण्यासाठी वसई तालुका शिवसेनेने शुक्र वारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पालघर जिल्हा संपर्क नेते अनंत तरे, जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांनी नेतृत्व केले. पूल वाहतुकीसाठी लवकर मोकळा करून वाहतूक कोंडी दूर केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी तरे यांनी दिला. (प्रतिनिधी)
वसईतील वरसावे पुलाच्या दुरुस्तीसाठी सेनेचे आंदोलन
By admin | Updated: March 25, 2017 01:07 IST