शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांच्या बाळाला आईचे यकृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 03:06 IST

पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

पालघर  - पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेवेळी त्याचे वजन केवळ ५.६ किलो होते. शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल यांच्या नेतृत्वाखालील चमूने मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. काव्यच्या यकृताच्या जागी त्याच्या आईच्या यकृताचा काही भाग प्रत्यारोपित करण्यात आला. ही शस्त्रक्रिया तब्बल १४ तास चालली आणि आता काव्यची प्रकृती सुधारली असून, त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.नऊ महिन्यांच्या काव्यला जन्मापासूनच यकृताचा बिलिअरी आर्टेसिया हा आजार झाला होता. या आजारामध्ये यकृतापासून आतड्यांपर्यंत पित्त वाहून नेणारी नलिकाच अस्तित्वात नसते. दोन महिन्यांचा असताना या बाळावर मुंबईतील एका रुग्णालयामध्ये एक मोठी शस्त्रक्रिया (पोर्टो-एंटरेस्टॉमी) करण्यात आली. ती अयशस्वी झाली आणि त्याच्या यकृताचे कायमचे नुकसान झाले. त्याच्या यकृताला लिव्हर सिºहॉसिस हा आजार झाला. त्यामुळे त्याची वाढ खुंटली. त्याचे वजन ५.६ किलोपर्यंत येऊन थांबले. त्याला कावीळ झाली आणि पोटात पाणी साचले, तसेच दोन प्रकारचे प्राणघातक संसर्ग झाले होते.काव्यचे वडील विवेक आणि आई निशा हे दोघेही वयाच्या तिशीत असून, रोजंदारीवर काम करतात. त्यांनी काव्यला मुंबई सेंट्रल रुग्णालयात दाखल केले, तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. शल्यचिकित्सक डॉ. गौरव गुप्ता यांनी सांगितले की, काव्याची आईची अलीकडेच प्रसूती झाली, असे असूनही तिने पुढाकार घेऊन यकृत प्रत्यारोपणाची तयारी दर्शविली. या शस्त्रक्रियेनंतर तिचीही प्रकृती आता सुधारली आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दान