शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सकलजनाची आई वजे्रश्वरीदेवी

By admin | Updated: October 16, 2015 01:51 IST

वसईच्या सीमेवर असलेली वजे्रश्वरीदेवी ही पालघर, ठाणे व मुंबई परिसरातील भक्तांची आराध्य दैवत असून दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिराच्या न्यासातर्फे विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

वसई : वसईच्या सीमेवर असलेली वजे्रश्वरीदेवी ही पालघर, ठाणे व मुंबई परिसरातील भक्तांची आराध्य दैवत असून दरवर्षी नवरात्रोत्सवात या मंदिराच्या न्यासातर्फे विविध अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. वजे्रश्वरीदेवी मंदिराचा परिसर हे पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात. तसेच वजे्रश्वरीदेवीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक माघारी परतत नाहीत.वजे्रश्वरी देवीच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला एखाद्या किल्ल्यावरच जात आहोत असा भास होतो. वजे्रश्वरी मातेचे मंदिर आजुबाजूच्या तटबंदी व बुरूजांमुळे किल्ल्यासारखेच वाटते. या मंदिराची रचना अतिशय सुुुंदर केली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर सभामंडप, गाभारा व मुख्य गाभारा असे तीन टप्पे आहेत. मुख्य गाभाऱ्यात देवीच्या सुंदर मुर्ती आहेत. या मंदिरात मध्यभागी वजे्रश्वरी माता उजच्या बाजूला रेणुका माता व डाव्या बाजूला कालिका मातेची भव्य मूर्ती आहे. यामूर्तीवरती चांदीचे छत्र असून नवरात्रीच्या दर दिवशी भरजरी वस्त्रांनी मूर्ती सजविली जातात. या मंदिरात या मूर्तीव्यतीरिक्त महालक्ष्मी, परशुराम, गणपती, मोरबादेवी यांचीही स्थापना करण्यात आली आहे. वजे्रश्वरी मंदिराना पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भही तेवढाच महत्वाचा आहे. १९६० पर्यंत वसई, तारापूर, माहिम, दमण व इतर किल्ले पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. पोर्तुगिजांचा अन्याय सहन न झाल्यामुळे येथील नागरीकांनी पेशव्यांना मदत करण्याचे साकडे घातले. यावेळी पेशव्यांनी चिमाजीआप्पांना वसईच्या स्वारीवर पाठविले. चिमाजीआप्पांनी वजे्रश्वरी मातेला असे साकडे घातले की, जर ही लढाई जिंकलो तर मी तुझे मंदिर किल्ल्यासारखे बांधेन. त्यानुसार चिमाजी आप्पांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर वजे्रश्वरी मातेचे मंदिर बांधून वजे्रश्वरीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाची आठवण म्हणून मंदिरासमोर दीपस्तंभ व दीपमाळा उभारण्यात आल्या आहेत. नागरीकांना वजे्रश्वरीच्या मंदिरात येण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा, वसई-विरार स्थानकावरून एस. टी. बस वाहतूक सेवा दररोज सुरू असते. तर ठाणे व कल्याण येथील नागरीकांना भिवंडी ते गणेशपुरी एस. टी. सेवा आहे.