शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसर्जन गर्दीप्रकरणी वसईत दोनशेहून जास्त गुन्हे; मनाई आदेश भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:06 IST

ग्रामस्थांची जंगी मिरवणूक

नालासोपारा : वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असतानाही गणपती विसर्जनात सर्रास उल्लंघन केले जात आहे. गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनावेळी वसई-विरारमध्ये दोनशेहून जास्त जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, वसई पोलीस ठाण्यात दोन, वालीव पोलीस ठाण्यात एक आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात पाच गुन्हे असे एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत.

अर्नाळ्यात सर्वच नियमच धाब्यावर बसवून ग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढली. नियम धाब्यावर बसवून जंगी मिरवणूक काढणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता तसेच तोंडाला मास्क न लावता तसेच दुपारी २ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गौरी-गणपतीचे विसर्जन करण्याची मुदत असताना वेळेची मर्यादा ओलांडणाºया १०० ते ११० जणांवर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्नाळा गावात २३४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १९७ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. सध्या २७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. गावात कोरोनाचा कहर झाला असताना ग्रामस्थांनी शासनाचे नियम गांभीर्याने न घेता गर्दी केल्याप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश अर्नाळा सागरी पोलिसांना दिले आहेत. याच गावात याआधी एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्या वेळीही काही ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.गणेशोत्सवाच्या आणि गौरी विसर्जनाच्या मिरवणुकीत गर्दी करणाºया ३ मंडळांवर, २ बेंजो पथकांवर तसेच १०० ते ११० आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रथम या सर्वांना नोटीस देऊन मग कारवाई करणार आहे. अर्नाळासारख्या गावात कोरोनाचा कहर असताना ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून नियमांचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - महेश शेट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस