शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस पडलाच नाही; मांत्रिकाला मात्र झाली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:13 IST

२१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच

पंचवटी : आडगाव शिवारातील नांदूरनाक्यावर एका वाहन बाजाराच्या कार्यालयात लिंबू, मिरच्या, पांढरी साडी, हिरवे कपडे आदी वस्तू मांडून तसेच एका २१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री पावणेबारा वाजेच्या सुमाराला आडगाव पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळाहून पूजेचे साहित्य तसेच मांत्रिकासह पाच संशयितांना अटक केली आहे. या प्रकारात नालासोपारा येथील गीता गंगाधर आंबेकर यांची फसवणूक झाली असून त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पैशांचा पाऊस पाडण्याचा डाव हाणून पाडल्याने पैशांचा पाऊस पडलाच नाही. भरवस्तीत घडलेल्या अघोरी विद्येच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील गीता गंगाधर आंबेकर या महिलेने आडगाव पोलिसांत तक्रार दिल्याने संशयितांवर जादूटोणाविरोधी कायद्या कलम २ आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच संशयितांना अटक केली आहे.आंबेकर यांना पैशांची गरज असल्याचे त्यांनी नाशिकरोड येथे राहणारे ओळखीचे प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले होते त्यांनी आंबेकर सांगितले की, काही मांत्रिक असून, ते मंत्राच्या शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात, परंतु त्यासाठी एक कुमारिका मुलगी देवी म्हणून बसवावी लागते तसेच मांत्रिक व पूजापाठ करण्यासाठी ६० हजार रुपये द्यावे लागतील ते केल्यावर मांत्रिक एक कोटी रुपयांचा पाऊस पाडेल, त्यावर विश्वास ठेवून त्यांनी होकार दिला. बुधवारी आंबेकर या पुतणीसह नाशिकरोडला आल्या तेथे संशयित सूर्यवंशी याच्याशी भेट झाल्यानंतर ३० हजार रुपये दिले व बाकी काम झाल्यानंतर पैसे देण्याचे ठरले त्यानंतर सिडकोतील मांत्रिक संदीप सीताराम वाकडे (३५), देवळाली गावातील सुधीर दत्तू भोसले (३४), सिडकोतील तुषार नरेंद्र चौधरी (४०), चंद्रकांत जेजूरकर, निखिल (मांत्रिक) पूर्ण नाव माहीत नाही यांची ओळख करून दिली.त्यानंतर संशयितांनी लिंबू, हळद, कुंकू, आंब्याची पाने, नारळ, अत्तर, विड्या, कानातील रिंग, पेढे, आदी वस्तू हिरव्या कपड्यात गुंडाळून पूजा मांडली व पुतणीला खोलीत पांढरी साडी परिधान करून दागिने परिधान करून डोळे मिटून बसण्यास सांगितले.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन सदाफुले, देवराम वनवे, नाजिम शेख, वैभव परदेशी, विनोद लखन, विजयकुमार सूर्यवंशी, मनोज खैरे, वैभव खांडेकर, दीपक भुसारे, राजू गांगुर्डे आदींनी घटनास्थळी जाऊन छापा मारला असता त्याठिकाणी संशयितांनी पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्या करून पूजा आढळून येताच पोलिसांनी मांत्रिकासह संशयितांना ताब्यात घेतले, तर एक मांत्रिक पसार झाला.