शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

मोखाड्याचे आदिवासी मजूर वेठबिगारीच्या पाशात; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:22 IST

बोट्याच्या वाडीच्या वेठबिगारांचे धक्कादायक वास्तव

- रविंद्र साळवेमोखाड : ग्रामीण भागात आजही आदिवासी मजुराला वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील बोट्याची वाडी गावातील आदिवासी मजूर कुटुंबाला कल्याण - उल्हासनगर येथील एका मालकाने चक्क वेठबिगार म्हणून बंधक बनवले. या कुटुंबातील तीन लोकांना घरी पाठवले मात्र परत येण्याची अट घालून त्यांच्या १३ वर्षीय मुलीला बंधक बनवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांच्या या गावात झालेल्या भेटीदरम्यान हा गंभीर प्रकार उघडकीस आला. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबाला वेठिबगारीच्या पाशातून मुक्त केले. गुरुवारी याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात मोहन भिका दिवे याने फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे.मोहन भिका दिवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मोहन याचे कुटुंब मोखाड्यात बोट्याची वाडी येथे राहते. पूर्वी ते भिवंडीतील पडघा येथे वीटभट्टीवर कामासाठी जायचे. गेल्या गणपतीच्या दरम्यान उल्हासनगर येथील योगेश वायले हा मालक आपल्या वडिलांसोबत वाडीत आला. त्याच्याकडे पूर्वी काम करत असलेल्या काही लोकांनी मोहनचे कुटुंब आणि योगेश वायले याची भेट करून दिली. शेठ चांगला आहे या समजुतीने मोहनचे कुटुंब कामावर जायला तयार झाले. त्यावेळेस योगेश याने ३००० (तीन हजार रुपये) रोख बयाना दिला. त्यानंतर पुन्हा गणपती गेल्यावर काही दिवसांनी येऊन १०,००० (दहा हजार रुपये) इतकी रक्कम देत मी घटस्थापनेनंतर घ्यायला येईन असे सांगून गेला. नंतर ठरलेल्या दिवशी येऊन योगेश याने मोहन, त्याचे आई-वडील, आणि गौरी (७), बायडी (९) आणि शैली (१३) या बहिणींसोबत हे पूर्ण कुटुंब उल्हासनगर ५ नंबर येथे नेले. विटांचे तुकडे भरणे, शेतातील काम, वीट भरायला - उतरवायला गाडीवर अशी अनेक कामे त्यांच्याकडून करून घेतली. सुट्या मजुराला (रोजंदारीच्या) ४०० रुपये देणारा मालक या बंधक मजुरांना केवळ २०० आणि महिलेला १०० मजुरी दडून शोषण करत होता. स्वत:कडे काम नसले की बाहेर कामाला पाठवून तिकडून येणाऱ्या मजुरीच्या पन्नास टक्के रक्कम मालक घेत असे.दिवाळीमध्ये या लोकांनी घरी जाण्याची मागणी केली असता मालकाने विरोध केला. मग तेरा वर्षीय शैला हिला बंधक बनवून ठेवत उर्वरित कुटुंबाला एक रुपयाही न देता गावाला पाठवले. जवळ वाचलेले १००० रु पये घेऊन कसेबसे हे कुटुंब मोखाड्यात पोहोचले. मुलगी मालकाकडे बंधक, खिशात दमडी नाही अशा स्थितीत या कुटुंबाची दिवाळी पार अंधारात गेली. शासकीय योजनेतून घरकुल लागलेले असल्याने मोहनचे वडील घरीच थांबले. दिवाळीनंतर गावातील कुणाकडून तरी ५०० रुपये उसनवारी घेऊन मोहनच्या वडिलांनी म्हणजे भिका दिवे यांनी मोहन, त्याची आई आणि दोन बहिणींना उल्हासनगर येथे धाडले.परत गेल्यावर मोहन आणि कुटुंबाला योगेश आणि त्याचा भाऊ राजू यांच्याकडे किंवा बाहेर मजुरीचे काम करावे लागे. बाहेर मिळालेल्या ३०० रु. मजुरीतून १०० रुपये त्यांना मिळत. कधी कधी तेही मिळत नसत. राजू हा गौरीला मारहाण तसेच शिवीगाळ करायचा. त्रासामुळे पळून जाण्याची इच्छा होती, पण शेठच्या भीतीमुळे काही करता आले नाही.पोलिसांची मदत घेत केली सुटकामोहनने वडील भिका दिवे यांना फोन करून सर्व सांगितले. शेवटी गावातील गावात त्यांनी याबाबत माहिती दिली. ही बाब श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच त्यांनी तातडीने या कुटुंबाला मुक्त करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.मोखाड्यातून पांडू मालक, गणेश माळी, उल्हास भानुशाली यांच्यासह कल्याण, अंबरनाथमधील राजेश चन्ने, वासू वाघे आदी कार्यकर्त्यांनी हिल लाईन पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांची मदत घेत या पूर्ण कुटुंबाला मुक्त केले. या घटनेबाबत पंडित यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.