शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण येथील बंदराविरोधात आमदारांनी दाखवली एकजूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:36 IST

Wadhwan Port News : डहाणू विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी वाढवण बंदराला विरोध दर्शवला आहे.

डहाणू : प्रस्तावित वाढवण बंदराच्या विरोधातील आंदाेलनाची धार तीव्र होत असून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाला विविध संघटना पाठिंबा देत असतानाच राजकीय पक्षांनीही या आंदोलनातउडी घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.डहाणू विधानसभा मतदारसंघाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील भुसारा यांनी वाढवण बंदराला विरोध दर्शवला आहे. या आंदोलनाला बळकटी देण्याची भूमिका घेत हे आमदार येत्या हिवाळी अधिवेशनात वाढवण बंदरविरोधी भूमिका मांडणार आहेत. शनिवारी डहाणूच्या शासकीय विश्रामगृहावर बंदरविरोधी काही कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला डहाणूचे आमदार कॉ. विनोद निकोले, राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांनी या बैठकीला उपस्थिती लावली. 

श्रीनिवास वनगा यांचाही विराेध पालघर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांना याविषयी विचारले असता त्यांनीहीबंदरविरोधात आपण स्थानिकांसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाढवण बंदराला आता सर्वच थरातून विरोध होत असतानाच जिल्ह्यातील सर्वच आमदार वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वाढवण बंदरविरोधी समितीला राजकीय बळ प्राप्त झाले आहे.  बंदर रद्द करण्यास भाग पाडूवाढवण बंदर हे स्थानिकांच्या मुळावर येणार प्रकल्प आहे. आंदाेलन करून बंदर रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार निकाेले यांनी यावेळी दिला. आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो, राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा कीर्ती मेहता, युवक जिल्हाध्यक्ष वरुण पारेख, नगरसेवक तन्मय बारी आदी या बैठकीला हाेते.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार