शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी आमदार अबू आझमींना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:07 IST

तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

पालघर : तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पालघर अपर व सत्र न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या रोख रकमेच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.तलासरी येथील विलाथपाडा येथील सुमारे १०० ते १५० एकर जमीन अबू आझमी, नदीम अहमद आदींनी विकत घेतली होती. या जमिनीच्या सभोवताली भिंत बांधण्याच्या आणि राखावलीच्या कामासाठी डोंगरी, विलाथ पाडा येथील फिर्यादी सितरा थापड, लक्ष्मण डावरे, चंदू थापड, मनू बिलात यांना १ नोव्हेंबर २०१६ पासून कामाला ठेवले होते. दरमहा १६ हजार पगार व रात्रीच्या ड्युटीस दुप्पट पगार ठरविण्यात आला होता. प्रत्येक महिन्यानंतर पगार मागण्यास गेल्यावर पाचशे ते हजार रु पये हातावर टेकवून काम पूर्ण झाल्यावर एकत्र रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.एक वर्ष काम करून वर्षभराचा पगार दिला जात नसल्याने पगार मागण्यासाठी फिर्यादीसह इतर नोकर ३० आॅक्टोबर रोजी गिरगाव (तलासरी) येथे गेले असता आरोपीने शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्र ार फिर्यादी थापड यांनी तलासरी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्याने फिर्यादीने पालघर सत्र न्यायालयात धाव घेतली.बजावले होते समन्सया प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना समन्स पाठविले. गुरु वारी या सर्वांनीपालघर न्यायालयात उपस्थिती दर्शविल्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याची माहिती आझमी यांचे वकील मोहसीन खान यांनी दिली.

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीpalgharपालघर